आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics Closing Ceremony; Tokyo Olympics 2021 Updates; Closing Ceremony News And Live Updates

फोटोंमध्ये पहा समारोप समारंभ:टोकियो ऑलिम्पिकमधील 339 स्पर्धेत 11 हजार खेळाडूंचा सहभाग; बजरंग पुनियाकडे भारतीय तुकडीचे नेतृत्व

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावेळी 11 हजार 90 खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता

कोरोना महामारीच्या सावटाखाली टोकियो ऑलिम्पिक पार पडत आहे. आज टोकियो ऑलिम्पिकचा शेवटचा दिवस असून समारोपीय सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा ऑलिम्पिक भारतीयांसाठी सर्वात यशस्वी ऑलिम्पिक मानला जात आहे. कारण ऑलिम्पिकमध्ये सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान, समारोपीय समारंभामध्ये सुरुवातीला यजमान जपान देशाचा ध्वज मंचावर आणण्यात आला. त्यानंतर सर्व देशांचे घ्वज स्टेडियममधील वर्तुळात दिसत होते. हे एक नेत्रदीपक दृश असून याने जगभरातील सर्वच लोकांची मने जिंकली आहेत.

समारोपीय समारंभात बजरंग पुनियाकडे भारतीय तुकडीचे नेतृत्व होते. बजरंगने कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा उद्घाटन समारंभ होतो, तेंव्हा सर्व खेळाडू त्यांचे झेंडे घेऊन चालतात. दरम्यान, या समारोपीय सोहळ्यात सर्व खेळाडू 'स्ट्रॉन्ग टुगेदर' चा संदेश देत आहेत. यावेळी 11 हजार 90 खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी 340 सुवर्ण, 338 रौप्य आणि 402 कांस्य पदक जिंकले आहेत.

जपानसाठी टोकियो ऑलिम्पिक सर्वोत्तम ठरले. 27 सुवर्णपदके जिंकण्याव्यतिरिक्त देशाने त्याच्या इतिहासात सर्वाधिक 58 पदके जिंकली.
जपानसाठी टोकियो ऑलिम्पिक सर्वोत्तम ठरले. 27 सुवर्णपदके जिंकण्याव्यतिरिक्त देशाने त्याच्या इतिहासात सर्वाधिक 58 पदके जिंकली.
टोकियो ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तिरंगा फडकला. भारतासाठी हे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक होते. बजरंग पुनिया हे भारताचे ध्वजवाहक आहेत.
टोकियो ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तिरंगा फडकला. भारतासाठी हे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक होते. बजरंग पुनिया हे भारताचे ध्वजवाहक आहेत.
भारतासाठी सर्वात यशस्वी ऑलिम्पिक. संघाने एकूण 7 पदके जिंकली.
भारतासाठी सर्वात यशस्वी ऑलिम्पिक. संघाने एकूण 7 पदके जिंकली.
समारोप समारंभासाठी ऑलिम्पिक स्टेडियम अशा प्रकारे सजवण्यात आले होते.
समारोप समारंभासाठी ऑलिम्पिक स्टेडियम अशा प्रकारे सजवण्यात आले होते.
समारोप समारंभादरम्यान ब्रिटनचे दल.
समारोप समारंभादरम्यान ब्रिटनचे दल.
रंगतदार कार्यक्रमादरम्यान स्टेडियममध्ये असे वातावरण होते.
रंगतदार कार्यक्रमादरम्यान स्टेडियममध्ये असे वातावरण होते.
सर्व खेळाडू स्टेडियममध्ये एका वर्तुळात उभे आहेत. मधे म्युझिक बँड्स स्टेजवर परफॉर्म करत आहेत.
सर्व खेळाडू स्टेडियममध्ये एका वर्तुळात उभे आहेत. मधे म्युझिक बँड्स स्टेजवर परफॉर्म करत आहेत.
सर्व देशांचे खेळाडू एकमेकांना भेटत आहेत आणि क्षणाचा आनंद घेत आहेत. आता त्यांना हा क्षण तीन वर्षांनीच मिळेल.
सर्व देशांचे खेळाडू एकमेकांना भेटत आहेत आणि क्षणाचा आनंद घेत आहेत. आता त्यांना हा क्षण तीन वर्षांनीच मिळेल.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, जपानचे क्राउन प्रिन्स अकिशिनो आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा हेही समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान आले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, जपानचे क्राउन प्रिन्स अकिशिनो आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा हेही समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान आले.
जगभरातील क्रीडापटू एकत्र येऊन चालतात आणि या क्षणाचा आनंद लुटतात.
जगभरातील क्रीडापटू एकत्र येऊन चालतात आणि या क्षणाचा आनंद लुटतात.
ऑलिम्पिक मैदानावर पेटती ऑलिम्पिक मशाल
ऑलिम्पिक मैदानावर पेटती ऑलिम्पिक मशाल
बातम्या आणखी आहेत...