आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics Coach Marijne Told The Players Believe In Yourself Do Not Think What Is Australias Strength; News And Live Updates

ऑलिम्पिकमध्ये खरोखर 'चक दे इंडिया':ऑस्ट्रेलिया संघ किती मजबूत हा विचार डोक्यातून काढा, फक्त हा विचार करा की तुम्ही काय करू शकता? मॅचपूर्वी कोचचे शब्द

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाचा संघ दबावाखाली असेल - मारिज

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने 3 वेळा चॅम्पियन विजेता ऑस्ट्रेलिया संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचे जुने रेकॉर्ड आणि पुल स्टेजमधील प्रदर्शन पाहात भारतीय संघ हा सामना जिंकेल हे अशक्य वाटत होते. परंतु, कर्णधार राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना जिंकत नवे इतिहास रचले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू

आपण काय करू शकतो हा विचार करा - प्रशिक्षक
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये इथपर्यंत पोहोचण्यात प्रशिक्षक जोरेड मारिजची मोठी भूमिका राहिली आहे. या कठीण काळात मारिजने आपल्या संघातील खेळाडूंना मानसिक बळ दिले. चक दे इंडिया चित्रपटातील कबीर खानसारखे मारिजने सामन्याच्या एका दिवसापूर्वी खेळाडूंशी बोलताना त्यांचे मनोबल वाढवले. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया संघ किती मजबूत आहे हे पाहू नका, हा विचार करा आपण काय करु शकता?

ऑस्ट्रेलियाचा संघ दबावाखाली असेल - मारिज
प्रशिक्षक मारिज खेळाडूंशी बोलताना म्हणाले होते की, ऑस्ट्रेलिया संघ किती मजबूत आहे, त्या संघाची ताकद आणि कमजोरी काय यापेक्षा आपण काय करु शकतो हा जास्त विचार करा. तुम्ही लोकांनी गेल्या विश्वचषकातील आयर्लंडचा पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेलादेखील पराभूत केले. या सामान्यात ऑस्ट्रेलिया संघावर प्रचंड दबाव असेल असे मारिज यावेळी म्हणाले होते.

मारिजने 2017 पासून भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत.
मारिजने 2017 पासून भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत.

पहिल्या क्वार्टरमध्ये बरोबरीचा सामना
दोन क्वार्टरचा खेळ झाला आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांनी गोल करण्याची 1-1 संधी गमावली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या फॉरवर्ड खेळाडूने भारतीय गोलवर हल्ला चढवला. पण भारतीय डिफेंडर्स समोर त्यांचे काहीच चालले नाही. भारताने खेळाच्या 9 व्या मिनिटाला एक गोल तयार केला होता, पण राणी रामपाल चूकली. वंदना कटारियाच्या पासवर राणीने स्ट्रोक घेतला, पण चेंडू गोलपोस्टमधून गेला.

बातम्या आणखी आहेत...