आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics Games LIVE Update; Kamalpreet Kaur | Women's Hockey Team, Tokyo Olympics 2nd August Latest News And Updates

पदरी पडली निराशा..!:टोकियो ऑलिम्पिक थाळीफेकमध्ये पदकापासून वंचित राहिली कमलप्रीत; अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉकीत भारताने रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमलप्रीतकडून भारताला पदक मिळेल अशी आशा होती. परंतु, कमलप्रीतला ऑलिम्पिकच्या 11 व्या दिवशी थाळीफेकमध्ये पदक जिंकता आले नाही. कमलप्रीतने अंतिम फेरीत सर्वोत्तम गुण 63.70 घेत ती सहाव्या स्थानावर राहिली. कमलप्रीतने 5 पैकी 2 फेऱ्यांमध्ये फाऊल फेकले आहे. तीने पहिल्या फेरीत 61.62 मीटर तर तिसऱ्या फेरीत 63.70 मीटर फेकले.

विशेष म्हणजे कमलप्रीतला क्वालिफाईंग फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. यावेळी तीने 64 मीटर अंतरासाठी थाळी फेकली होती. परंतु, ती कामगिरी आता करता न आल्याने तीला पदकापासून वंचित राहावे लागत आहे.

हॉकीत भारताने रचला इतिहास
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने 3 वेळा चॅम्पियन विजेता ऑस्ट्रेलिया संघाला क्वार्टर फायनलमध्ये पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचे जुने रेकॉर्ड आणि पुल स्टेजमधील प्रदर्शन पाहात भारतीय संघ हा सामना जिंकेल हे अशक्य वाटत होते. परंतु, कर्णधार राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना जिंकत नवे इतिहास रचले आहे.

बातम्या आणखी आहेत...