आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tokyo Olympics Qatar Athlete Refused To Take Gold Alone Shared This Medal With Injured Italian Player; News And Live Updates

ऑलिम्पिकमध्ये मानवतेचे पदक:प्रतिस्पर्धी खेळाडू जखमी होताच विजेत्या खेळाडूने पदक घेण्यास दिला नकार, दोघांना मिळाले सुवर्ण

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेवटच्या उडीपूर्वी जखमी झाला इटालियन खेळाडू

जगातील कोणत्याही खेळाडूंचे स्वप्न हे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे असते. ही खेळ जगतातील यशाची सर्वोच्च पातळी मानली जाते. परंतु, कतारचा खेळाडू मुताज एस्सा बार्शीम यापासून एक पुढे गेले आहे. मुताज यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक तर जिंकलेच पण त्यासोबत मानवतेचे पदकदेखील जिंकले आहे. मुताज बार्शीम यांनी प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यामुळे बार्शीम यांनी जगभरातील क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहे. चला तर हे कसे घडले ते पाहू...

दोघांनी 2.37 मीटर मारली उडी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेदरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, बार्शीम आणि तांबेरी या दोघांनी 2.37 मीटर उडी मारून प्रथम स्थान पटकावले. त्यानंतर इव्हेंटच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही प्रत्येकी तीन उडी मारण्यास सांगितले. विशेष म्हणजे या तीन उडींमध्ये एकही खेळाडू 2.37 मीटरच्या वर जाऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना बराबरीत आला होता.

बार्शीमने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाहीतर जगभरातील क्रीडाप्रेमींचे मने जिंकली आहेत
बार्शीमने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाहीतर जगभरातील क्रीडाप्रेमींचे मने जिंकली आहेत

शेवटच्या उडीपूर्वी जखमी झाला इटालियन खेळाडू
स्पर्धेदरम्यान, जेंव्हा तीन उडी मारल्यानंतरही निर्णय झाला नाही तेंव्हा अधिकाऱ्यांनी दोघांनाही एक-एक उडी मारायला सांगितली. परंतु, ही उडी मारण्यापूर्वी इटालियन खेळाडू तांबेरी जखमी झाला, त्यामुळे त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली. यावेळी बार्शीमला एक उडी मारत सुवर्ण पदक जिंकण्याची संधी होती.

सुवर्ण पदक मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा तांबेरी.
सुवर्ण पदक मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा तांबेरी.

असे मिळवून दिले पदक
इटालियन खेळाडूने माघार घेतल्यानंतर बार्शीम यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, मी या स्पर्धेतून माघार घेतल्यास काय होईल. दरम्यान, अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, तुम्हा दोघांना सुवर्ण पदक मिळले. त्यामुळे बार्शीमने यातून माघार घेतली आणि प्रतिस्पर्धी जखमी खेळाडूला सुवर्णपदक जिंकून दिले.

बातम्या आणखी आहेत...