आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलगच्या पराभवाची मालिका खंडित करून आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ सज्ज झाले आहेत. या दाेन्ही संघांमध्ये आज मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना हाेणार आहे. दिल्लीच्या या मैदानावर आज षटकारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, टी-२० फाॅरमॅटमधील टाॅप-४ सिक्सर्स हिटर्स या सामन्यादरम्यान मैदानावर असतील. त्यांनी गत आयपीएलच्या सत्रात षटकारांचे शतक साजरे केले. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या टीम डेव्हिड (१२४ षटकार), सूर्यकुमार यादव (१०१), दिल्लीचा राइली रुसाे (१२३), राेवमॅन पाॅवेल (१०१) यांचा समावेश आहे. यामुळे हा सामना अधिक रंगतदार हाेण्याचे चित्र आहे.
राेहितच्या मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत सलग दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. यामुळे आपला सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी मुंबई संघाने कंबर कसली आहे. दिल्ली संघाची पराभवाची हॅट्ट्रिक झाली आहे.
२०१३ मधील त्या आठवणी दूर करण्यास दिल्ली उत्सुक दिल्लीच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि यजमान दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना हाेणार आहे. यातील एकाच संघाला यंदाच्या आयपीएलमधील पराभवाची मालिका खंडित करता येणार आहे. कारण, दाेन्ही संघांना अद्याप लीगमध्ये यंदा विजयाचे खाते उघडता आले नाही. २०१३ मध्ये दिल्ली संघाला सुमार खेळीमुळे सलग ६ सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. मात्र, आता याच कटु आठवणी दूर करण्यासाठी दिल्ली संघ उत्सुक आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत चेन्नई आणि बंगळुरू टीमने धूळ चारली. त्यामुळे संघाची यंदा लीगमध्ये निराशाजनक सुरुवात झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.