आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20:भारतीय संघाचे अव्वल स्थान कायम; मालिका विजयाने सात गुण

दुबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान टीम इंडियाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. या मालिका विजयाने भारतीय संघाला अायसीसीच्या टी-२० क्रमवारीत माेठा फायदा झाला. यातून टीमच्या नावे सात गुणांची नाेंद झाली. यातून भारतीय संघाला क्रमवारीतील आपले नंबर वनचे स्थान कायम ठेवता आले. आता भारतीय संघ २६८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे मालिका पराभवाने आॅस्ट्रेलियाचे एका गुणाने नुकसान झाले. ऑस्ट्रेलिया संघ ३९ सामन्यांत २५० गुणांसह क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. इंग्लंड संघ ३८ सामन्यांत २६१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने ३४ सामन्यांत २५८ गुणांसह तिसरे स्थान राखून ठेवले आहे.

आपल्या घरच्या मैदानावर सर्वाेत्तम कामगिरी करत असलेल्या पाकिस्तान संघाने ४० सामन्यांत २५८ गुणांसह चाैथे स्थान कायम ठेवले आहे..