आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Transformation Of 5 Stadiums Across The Country Including Wankhede; 500 Crore Sanction

स्टेडियमचा कायापालट:वानखेडेसह देशभरातील 5 स्टेडियमचा कायापालट; 500 काेटींची मंजुरी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात हाेणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या आयाेजनाला आता चांगलाच वेग आला आहे. ५ ऑक्टाेबरपासून वर्ल्डकपला सुरुवात हाेत आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशभरातील मुंबईतील वानखेडेसह पाच स्टेडियमचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. यातून ५०० काेटी रुपये खर्च करून दिल्लीसह पाच स्टेडियम झगमगणार आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसाेटी मालिकेदरम्यान चाहत्यांनी स्टेडियममधील असुविधांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली.