आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Triangular Series | India Windies Women's Team Match Will Be Played Today, Indian Team Has A Chance To Win

तिरंगी मालिका:आज भारत-विंडीज महिला संघांमधील सामना रंगणार, भारतीय संघाला विजयाची संधी

लंडन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला संघ आता तिरंगी मालिकेत दुसरा टी-२० सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना साेमवारी विंडीजविरुद्ध हाेणार आहे. भारत आणि विंडीज संघ आज समाेरासमाेेर असतील. सलामी सामना जिंकून भारतीय संघाने किताबच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली आहे. या विजयाने भारतीय महिला संघ गुणतालिकेत २ गुणांसह अव्वलस्थानी आहे. आता भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्या विजयाची संधी आहे. भारताने आतापर्यंत ६ वर्षे आणि २ महिन्यांपासून विंडीजविरुद्ध विजयी माेहीम कायम ठेवली आहे.

कर्णधार स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघ आता याच माेहिमेला कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे. संघाची दीप्ती, जेमिमा, अमरज्याेत सध्या फाॅर्मात आहेत. त्यांच्याकडून माेठ्या खेळीची आशा आहे. अमरज्याेतने दमदार पदार्पण करताना संघाला विजय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...