आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Two Cricket Teams At A Time Others Nations Can Adopt Indian Strategy In Future

एका देशाचे दोन संघ:भारताप्रमाणे इतर देशही अवलंबू शकतात हे मॉडेल, जानकार म्हणाले- असे करणे काळाची गरज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1998 मध्ये भारताने दोन संघ तयार केले होते

भारतीय संघ जुलै महिन्यात वनडे आणि टी-20 सीरीज खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. परंतु, त्याच वेळेस भारताची 20 खेळाडूंची एक टीम इंग्लंडमध्ये असेल, जी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडसोबत पाच टेस्ट सामन्यांची सीरिज खेळेल. म्हणजे, एकाच वेळेला भारताच्या दोन टीम दोन वेगवेगळ्या देशात खेळतील.

असे म्हटले जात आहे की, येणाऱ्या काळात इतर देशही दोन संघाच्या मॉडेलचा अवलंब करू शकतात. जानकारांचे म्हणने आहे की, हे करणे काळाची गरज आहे. पण, दोन संघ तयार करणे शक्य आहे का ? यापूर्वी दोन संघ झाले आहे का आणि महत्वाचे म्हणजे असे करणे का गरजेचे आहे ?

1998 मध्ये एक टीम पाकिस्तानसोबत खेळत होती, तर दुसरी कॉमनवेल्थ गेम्समध्ये

भारताने एकेकाळी दोन संघ तयार केले आहेत. 1998 मध्ये भारताचा एक संघ पाकिस्तानविरोधात कॅनडामध्ये वनडे सीरीज खेळत होता, तर दुसरा संघ अजय जडेजाच्या नेतृत्वात मलेशियामध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळत होता. त्यावेळेस पाकिस्ताननेदेखील दोन संघ तयार केले होते.

यावर्षी ऑस्ट्रेलिया दोन संघ बनवण्याच्या तयारीत

यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियादेखील दोन संघ तयार करण्याच्या तयारीत होता. एक टीम न्यूजीलंडसोबत खेळत होती, तर, दुसरी टीम टेस्ट सीरीजसाठी साउथ आफ्रीकेच्या दौऱ्यावर जाणार होती. पण, कोरोना वाढल्यामुळे आफ्रीका दौरा रद्द करण्यात आला.

जेम्स सदरलंडने 2010 मध्ये दिला होता सल्ला

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी CEO जेम्स सदरलंडने 2010 मध्ये एका देशाच्या दोन टीम बनवण्याचा सल्ला सुचवला हता. ते म्हणाले हते की, जगात अनेक ठिकाणी लीग होत असल्यामुळे क्रिकेटसाठी वेळ मिळत आहे. त्यामुळे सर्व दौरे पूर्ण करण्यासाठी दोन संघ करणे गरजेचे आहे. सदरलंडने भारताच्या दोन संघांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आज नाहीतर उद्या असे होणारच होते. ही काळाची गरज आहे. भारताने चांगला निर्णय घेतला आहे.

देशात क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर चांगले करणे काळाची गरज

जानकारांचे म्हणने आहे की, एकावेळी दोन संघ तयार करण्यासाठी देशाकडे चांगल्या क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी हे करणे अवघड नाही.

बातम्या आणखी आहेत...