आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Asif Khan | UAE | Fourth Fastest ODI Century | Fastest 100s In ODI | Cricket

सिक्सर, सिक्सर अन् सिक्सरच...:UAE च्या आसिफ खानची स्फोटक खेळी; 11 षटकारांसह अवघ्या 41 चेंडूंत ठोकले चौथे वेगवान शतक

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ICC वर्ल्डकप लीग- 2 च्या 21 व्या फेरीच्या 6व्या सामन्यात (नेपाळ वि. यूएई) यूएईच्या आसिफ खानने ऐतिहासिक खेळी केली. आसिफने 4 चौकार व 11 षटकारांसह अवघ्या 41 चेंडूंत शतक ठोकले. त्याचे शतक वनडेतील चौथी सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे. आसिफने 240.48 च्या स्ट्राइक रेटने या धावा कुटल्या.

आसिफच्या खेळीच्या जोरावर यूएईने 50 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा केल्या. आसिफसह अरविंदने 94, तर यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीमने 63 धावा केल्या. सामन्यात यूएईने प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्कॉटलँड व ओमानचा संघ वर्ल्डकपच्या क्लालिफायरसाठी थेट पात्र ठरला आहे. आज यूएईने नेपाळचा पराभव केला, तर तो वर्ल्डकप क्वालिफायरसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरेल. याऊलट नेपाळचा पराभव झाला तर नामीबियाचा संघ तिसरा संघ म्हणून क्वालीफाय ठरेल.

आसिफ खानने रचला इतिहास

UAE च्या आसिफ अलीने असोसिएट देशांच्यावतीने सर्वात वेगवान शतक ठोकून इतिहास रचला आहे. यामुळे त्याचे नाव जागतिक रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावे आहे.

डिव्हिलियर्सने अवघ्या 31 चेंडूंत शतक ठोकले. या प्रकरणी कोरी अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 36 चेंडूंत शतक ठोकले. तर 37 चेंडूंत शतक ठोकणारा पाकचा शाहीद आफ्रिदी या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता चौथ्या क्रमांकावर यूएईच्या आसिफ खानचे नाव कोरले गेले आहे. खानने मार्क बाउचरचा विक्रम मोडला. बाउचरने 44 चेंडूंत वनडे शतक ठोकले होते.

क्रिकेटशी संबंधित खालील बातम्या वाचा...

दिल्ली कॅपिटल्स IPL 2023:डेव्हिड वॉर्नर झाला दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, तर अक्षर पटेलला मिळाले उपकर्णधारपद

दिल्ली कॅपिटल्सने IPL 2023 साठी आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

...अन् पोलार्डच्या स्टंपने मारल्या हवेत कोलांटउड्या:हारिस राउफची घातक गोलंदाजी; ताशी 154 किमी वेगाने फेकला चेंडू, VIDEO

पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या पहिल्या पात्रता सामन्यात मुल्तान सुल्तान संघाने लाहोर कलंदर्सचा 84 धावांनी पराभव केला. मुल्तान सुल्तानसाठी पोलार्डने तुफानी खेळी खेळली आणि 34 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह 57 धावा केल्या. किरॉन पोलार्डच्या दमदार खेळीमुळे मुल्तानचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 160 धावा करू शकला, तर लाहोरचा संघ 14.3 षटकात केवळ 76 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुलतान सुल्तानचा संघ PSL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...