आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड अॅक्वेटिक्स चॅम्पियनशिप:युक्रेन ठरला महिला टीम फ्री कॉम्बिनेशनमध्ये नंबर वन

बुडापेस्ट7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंगेरी येथे आयोजित वर्ल्ड अॅक्वेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जगभरातील जवळपास १८५ देशांतील जलतरणपटू सहभागी हाेत आहेत. रशियन आणि बेलारूसच्या जलतरणपटूंना या स्पर्धेत सहभागी हाेण्यास नकार देण्यात आला. युक्रेन संघाने महिलांच्या आर्टिस्टिक टीम फ्री कॉम्बिनेशनच्या पहिल्याच फेरीत अव्वल स्थान गाठले. टीमने ९३.९३३ गुणांची कमाई केली. युक्रेन संघाने आतापर्यंत राैप्यपदकाची कमाई केली.

अमेरिकन जलतरणपटू केटीने जिंकले १६ वे सुवर्णपदक
अमेरिकन २५ वर्षीय जलतरणपटू केटी लेडकीने वर्चस्व अबाधित ठेवताना सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. तिने ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या सात वेळच्या आॅलिम्पिक चॅम्पियनने ३ मिनिटे ५८.१५ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. यासह तिच्या नावे आता करिअरमध्ये १६ व्या सुवर्णपदकाची नाेेंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...