आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेव्हा मी भारतात खेळत होतो, तेव्हा मला माझ्या देशात खेळत असल्याचा अनुभव येत असे. येथील क्रिक्रेटप्रेमींनी भारताबरोबरच पाकिस्तानच्या खेळाडूंना देखील सन्मान दिला आहे, असा अनुभव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू उमर अकमल याने शेअर केला. आशिया चषक यावेळी पाकिस्तानात होणार असून बीसीसीआयने इंडिया टीमचा पाक दौरा रद्द केल्यानंतर या निर्णयावर अकमल याने प्रतिक्रिया दिली.
2013 मध्ये झाली होती शेवटची द्विपक्षीय मालिका
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2013 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकेकडे कोणताही विचार केला जात नाही. चाहत्यांना आता या देशांमधली स्पर्धा एकतर ICC टूर्नामेंटमध्ये पाहायला मिळेल.
दोन्ही देशात राजकीय तणाव, चाहत्यांकडून खूप प्रेम
दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढत असला तरी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या वेळी दोन्ही देशांचे चाहते चांगल्या खेळासाठी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. चाहत्यांनी चांगली लढत अनुभवली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू उमर अकमलने आता भारत-पाक यांच्यातील सामन्यांचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला की, मला भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. जेव्हा मी भारतात खेळतो तेव्हा त्याला आपल्याच देशात खेळत असल्याचे वाटते. असा अनुभव देखील त्याने सांगितला आहे.
प्रेक्षक दोन्ही संघाचा आदर करतात- उमर
जेव्हा मी भारतात खेळतो तेव्हा असे वाटते की, मी माझ्या देशात खेळत आहे. प्रेक्षक दोन्ही संघांचा खूप आदर करतात. ते फक्त भारतीय संघालाच आदर देतात असे नाही. जो संघ तिथे येतो त्याला ते खूप मान देतात. विशेषत: पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खूप मान मिळतो. क्रिक्रेट चाहते दोन्ही संघांचा आदर करतात. भारतीय चाहतेही पाकिस्तानी खेळाडूंना प्रोत्साहन देतात.
BCCIने पाक दौरा रद्द केला,
विशेष बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक यावेळी पाकिस्तानात होणार असला तरी बीसीसीआयने पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. भारताच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले होते. जर भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही, तर दोन पाकिस्तानी संघ देखील एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.