आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Umesh Yadav Replace Shardul Thakur; India Playing 11 Announce For Pink Ball 3rd Test Vs England In Ahmedabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय संघाची घोषणा:इंग्लडविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा; उमेश यादवला मिळू शकते संधी

अहमदाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डे-नाईट कसोटी सामन्यात खेळू शकतात तीन गोलदांज

इंग्लडविरुद्धच्या चार कसोटी मालिकेतल्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलदांज उमेश यादवला शार्दूल ठाकूरच्या जागेवर संधी मिळाली आहे, पण त्याची निवड फिटनेस टेस्टच्या आधारावर होईल. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणारा तिसरा कसोटी सामना हा अहमदाबामधील मोटेरा स्टेडीयममध्ये किंवा होणार आहे. उमेशने आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरोधात मेलबर्न येथे खेळला होता.

शार्दुलला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज केले जाणार

बीसीसीआयने आपल्या जारी निवेदनात म्हटले आहे की, शार्दुलला देशार्तंगत गट-अ मधील विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी रिलीज केले जाणार आहे. शार्दुलला ऑस्ट्रेलियाविरोधातल्या चार कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातील 11 खेळाडूत जागा मिळाली होती. यात त्याने चांगली कामगिरी दाखवली होती. परंतू शार्दूल हा संघाचा भाग असूनही त्याला इंग्लडविरोधात 11 खेळाडूमध्ये जागा मिळाला नव्हती.

डे-नाईट कसोटी सामन्यात खेळू शकतात तीन गोलदांज

डे-नाईट कसोटी सामन्यासाठी गुलाबी बॉलचा वापर होईल. संध्याकाळनंतर वातावरणात गारवा आणि खेळपट्टीवरील हलक्या गवतामुळे गोलदांजाला फायदा होईल. दरम्यान, भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात तीन वेगवान गोलदांजाना उतरवण्याच्या तयारीत आहे.

जसप्रीत बुमराह पुर्णपणे फिट असल्यास इंशात, बुमराह आणि मोहमद सीराजला संधी मिळू शकते. तसेच, यातील एखाद्या गोलंदाजाला विश्राम मिळाल्यास उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, वेगवान गोलदांजसोबत हार्दीक पंड्याला संधी देण्याचाही संघ व्यवस्थापन विचार करत आहे.

शेवटच्या दोन कसोटीसाठी असा असेल संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

उमेशचा प्रवेश फिटनेसवर अवलबूंन

स्टँडबाय खेळाडूः के एस भारत आणि राहुल चहर.

नेट गोलंदाज: अंकित राजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णाप्पा गौतम आणि सौरभ कुमार.

बातम्या आणखी आहेत...