आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL 15 मध्ये 157 kmph च्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकची टीम इंडियात निवड झाली आहे. जम्मू एक्सप्रेस उमरान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होम टी-20 मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो. मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, आम्ही आमच्या देशात उमरानसारख्या अनेक वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. उमरानचा आम्हाला धोका नाही. या विषयावर आणि उमरानच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी दिव्य मराठीशी त्याने दिलली खास मुलाखत…
प्रश्न : टी-20 वर्ल्ड कप येणार आहे, लोक म्हणत आहेत की बाबर आझम आणि तुझ्यामध्ये युद्ध होईल, याबद्दल तुला काय वाटते?
उमराण : जेव्हा आम्ही समोरासमोर येऊ तेव्हा बघू. तोही त्याचे सर्वोत्तम देईल आणि मीही माझे सर्वोत्तम देईन. मी माझ्या संघाला जिंकण्यासाठी खेळेन. बाबर सोबत भेट तर मैदानातच होईल. त्यावेळी पाहुया. माझे एकच स्वप्न आहे की मला माझ्या देशासाठी खेळायचे आहे.
प्रश्न : तू एवढ्या वेगाने गोलंदाजी करतोस, त्यासाठी तू कोणता आहार घेतोस?
उमराण: काही नाही, मी घरी फक्त मसूरची दाळ आणि रोटी खातो आणि कोणताही अतिरिक्त आहार घेत नाही. मी नियमित सराव करतो. मी दररोज 10 ते 15 षटके टाकण्याचा सराव करतो. फलंदाजांना बाद करण्यात मला खूप आनंद होतो.
प्रश्नः दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, आम्ही उमरानसारख्या अनेक वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. त्याचा आम्हाला धोका नाही. यावर तुमचे काय म्हणणे आहे?
उमराण : मी त्यांच्या कर्णधाराबद्दल काहीही बोलणार नाही, काहीही झाले तरी आम्ही सामन्यात पाहू. मला खेळण्याची संधी मिळाल्यास मी 150 आणि त्याहून अधिक वेगाने गोलंदाजी करेन आणि माझ्या संघाला विजय मिळवून देईन.
प्रश्न: संपूर्ण IPL मध्ये 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे, त्याचा प्रवास कसा होता, तू इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकता असे कधी वाटले?
उमरान: IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादचा नेट बॉलर असताना मला हा वेग कळला. यापूर्वी मी जम्मू-काश्मीर संघात अंडर-19 आणि अंडर-23 संघात खेळलो, पण मला अनेक सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. माझ्या वेगामुळेच मी आधी हैदराबाद संघात आणि नंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकलो.
प्रश्न : लोक म्हणतात की तू वकार युनूससारखी गोलंदाजी करतोस, आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे की तू कोणत्या गोलंदाजाला आपला आदर्श मानता?
उमरान : मी वकार युनूसला फॉलो केलेले नाही. माझी गोलंदाजी नैसर्गिक आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे माझे आदर्श आहेत. मी बराच काळ त्यांना फालो करत आहे.
प्रश्नः IPL मध्ये कोणत्या खेळाडूने विकेट्स घेण्याचा आनंद घेतला आणि तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?
उमरान: श्रेयस अय्यर, नितीश राणा आणि जोस बटलर यांच्या विकेट घेतल्याबद्दल आनंद झाला आणि हो मी चित्रपट पाहत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.