आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलचे यंदाचे सत्र हे जरा वेगळ्या स्वरूपामुळे लक्षवेधी ठरत आहे. यामधील इम्पॅक्ट प्लेअरची संकल्पनाही चांगलीच चर्चेत आहे. आता टीमच्या ११ बराेबरच १२ वा खेळाडूही दिसत आहे. त्यालाच इम्पॅक्ट प्लेअर म्हटले जाते. ताे प्लेइंग इलेव्हनमधील काेणत्याही खेळाडूच्या जागी पर्यायी म्हणून मैदानावर खेळू शकताे. त्याला गाेलंदाजीसह फलंदाजीची संधी मिळते. मात्र, यादरम्यान बदली खेळाडूच्या भूमिकेतील त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक ठरली नाही. ५ सामन्यांत ९ संघांनी याला पसंती दर्शवली. मात्र, चॅलेंजर्स बंगळुरूने अद्याप याचा वापर केला नाही.
तुषार देशपांडे : पहिला इम्पॅक्ट प्लेअर; ३.२ षटकांत ५१ धावा चेन्नई संघाचा वेगवान गाेलंदाज तुषार देशपांडे लीगच्या इतिहासात पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरला. त्याला गुजरातविरुद्ध चेन्नई टीमने आपल्या अंबाती रायडू्च्या जागी संधी दिली. त्याने ३.२ षटकांत ५१ धावा दिल्या.
व्यंकटेश अय्यर : तुफानी खेळीनंतरही केकेआरचा पराभव काेलकाता संघाने आॅलराउंडर व्यंकटेश अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली नव्हती. मात्र, १९२ चा पाठलाग करताना वरुणच्या जागी व्यंकटेशला संधी मिळाली. त्याने २८ चेंडूंत ३४ धावा काढल्या. मात्र, काेलकाता संघ पराभूत झाला.
साई सुदर्शन : जायबंदी विलियम्सनमुळे मिळाली संधी सामन्यादरम्यान गुजरात संघाने साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेअरची संधी दिली. त्याची जायबंदी विल्यम्सनच्या जागी निवड झाली. मात्र, तिसऱ्या स्थानी फलंदाजी करताना साईने १७ चेंडूंत २२ धावा काढल्या.
कृष्णप्पा गाैतम : पहिल्यांदा डाव संपण्यापूर्वी मिळाली संधी दिल्ली संघाविरुद्ध लखनऊने आयुषला संधी दिली. त्याच्या जागी कृष्णप्पा गाैतमला संधी मिळाली. त्याने ४ षटकांत २३ धावा दिल्या. मात्र, त्याचा यादरम्यान बळी घेण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला.
ऋषी धवन : १ षटकात दिल्या १५ धावा; पुन्हा संधीच नाही पंजाब संघाने सलामीला काेलकाता टीमवर मात केली. मात्र, इम्पॅक्ट प्लेअरचे काेणतेही याेगदान मिळाले नाही. भानुका राजपक्षेच्या जागी पंजाबने ऋषी धवनला संधी दिली. त्याने एकाच षटकात १५ धावा दिल्या.
अमर खान : पाॅवर हिटर, मात्र ५ चेंडूंत ४ धावा काढून बाद दिल्लीच्या ५ बाद ९४ धावा असताना अमन खानला संधी मिळाली. ताे वेगवान गाेलंदाज खलील अहमदच्या जागी आला. काेच पाँटिंगने या बिग हिटरवर विश्वास ठेवला. मात्र, त्याने ५ चेंडूंत ४ धावा काढून पॅव्हेलियन गाठून सर्वांची निराशा केली.
नवदीप सैनी : फक्त डाव सावरण्यासाठी उतरला राजस्थानचा सामन्यात हैदराबादविरुद्ध विजय जवळपास निश्चित हाेता. दरम्यान, टीमने दुखापतीतून सावरलेल्या वेगवान गाेलंदाज सैनीला डाव सावरण्यासाठी इम्पॅक्ट प्लेअरची संधी दिली. त्याने २ षटकांत ३४ धावा दिल्या.
समद : १०० च्या स्ट्राइक रेटने ३२ चेंडूंत ३२ धावा हैदराबाद संघाने गाेलंदाज फलजहकच्या जागी अब्दुल समदला संधी दिली. यादरम्यान संघाने ५ विकेट गमावल्या हाेत्या. १०० च्या स्ट्राइक रेटने समदने ३२ चेंडूंत ३२ धावा काढत पराभवाचे अंतर कमी केले.
जेसन बेहरेनडाॅर्फ : पहिला विदेशी प्लेअरही फ्लाॅप मुंबई संघाने आयपीएलमध्ये जेसन बेहरेनडाॅर्फला पहिला इम्पॅक्ट प्लेअर हाेण्याचा बहुमान मिळवून दिला. त्याला बंगळुरू संघाविरुद्ध संधी मिळाली. मात्र, टीमला आपला पराभव टाळता आला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.