आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघाने अजिंक्यपदावर ताबा मिळवून निर्विवाद वर्चस्व कायम राखले. राष्ट्रीय स्पर्धेत सुरुवातीपासूनच महाराष्ट्र संघाने नावाला साजेसा आक्रमक खेळ करून अंतिम सामन्यात कर्नाटक संघावर एकतर्फी मात करून राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. महिला संघानेही अंतिम सामन्यात चेन्नई संघाला नमवून जेतेपद मिळवले. पुरुषांच्या विजेत्या संघात अमित आग्रे, सूरज पवार, पांडुरंग पाटील (रत्नागिरी), जाफर शेख, आशिष जगताप, विशाल खवले (बीड), शरद बढे (उस्मानाबाद), फिरोज पठाण, पार्थ सुतार (सोलापूर), प्रतीक अलिबागकर, संकेत साळुंखे, सिद्धेश दरेकर (पुणे), दीपक जाधव (बुलडाणा), गिरीराज गुप्ता (यवतमाळ), प्रकाश सपकाळे (जळगाव). संघ व्यवस्थापक बंडू मुरकुटे (बीड), संघ प्रशिक्षक प्रफुल्ल गाभरे (अमरावती) यांचा समावेश होता. महिला संघात निकिता चव्हाण, कनिष्का दुधागी, मेहरुन्नीसा शेख (पुणे), आरती मरसकोल्हे, पूर्वा गोरडे (अमरावती), प्रगती भोई, यशवंती मंडाले, शिवानी मंडाले, सूर्या सावंत (सोलापूर), तृप्ती जाधव (वाशीम), प्रियंका धायगुडे (सातारा), रश्मी थोटे (वर्धा), प्रीती लोखंडे (नांदेड), कल्याणी कश्यप (रायगड), आरती निंबाळकर (जळगाव) यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.