आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • University Teams Of Amravati, Nanded, Kolhapur Entered The Final Eight, Four All India Teams Will Be Decided Today.

कबड्डी:अमरावती, नांदेड, काेल्हापूरचे विद्यापीठ संघ अंतिम आठमध्ये दाखल, आज निश्चित हाेणार ऑल इंडियाचे चार संघ

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि काेल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ महिला संघांनी आपली विजयी माेहीम कायम ठेवताना गुुरुवारी पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. यासह आता या संघांना दणदणीत विजयाच्या बळावर आज शुक्रवारी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. यासाठी महाराष्ट्रातील या तिन्ही विद्यापीठ महिला संघांना अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. यजमान संघाने घरच्या मैदानावरील लढतीत विजय मिळविला. यजमान संघाने लढतीत गुजरातच्या चारुतर विद्या मंडळ विद्यापीठ, गुजरातवर ५२ गुणांनी विजय मिळविला.

बातम्या आणखी आहेत...