आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • US Open : First Time 3 Mothers In Quarterfinals; Serena Three Steps From The 24th Grand Slam Book

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूएस ओपन:पहिल्यांदा 3 माता क्वार्टर फायनलमध्ये; 24 व्या ग्रँडस्लॅम किताबापासून सेरेना तीन पावलावर

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेरेना विल्यम्स, अझारेंका, पिरोनकोवा अंतिम आठमध्ये पोहोचल्या

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह तीन माता यूएस ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्या. स्पर्धेतच्या इतिहासात प्रथमच असे घडले. सेरेनासह व्हिक्टोरिया अझारेंका व त्स्वेताना पिरोनकोवा देखील अंतिम आठमध्ये पोहाेचल्या. तिसऱ्या मानांकित सेरेनाने ग्रीसच्या मारिया सक्कारीला ३ सेटच्या लढतीत ६-३, ६-७, ६-३ ने हरवले. हा सामना २ तास २८ मिनिटे चालला. सहा वेळेची चॅम्पियन सेरेनाचा हा आर्थर ऐश स्टेडियममधील १०० वा विजय ठरला. ती अशी कामगिरी करणारी पहिली खेळाडू बनली. तिने हा किताब जिंकल्यास मार्गेट कोर्टच्या २४ कितबाशी बरोबरी करेल. दुसरीकडे, बुल्गारियाच्या पिरोनकोवाने फ्रान्सच्या एलिज कॉर्नेटला ६-४, ६-७, ६-३ ने हरवले. ती पहिल्यांदा स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली. त्याचप्रमाणे अझारेंका ४ वर्षांनी ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळेल.

थिएम व मेदवेदेव क्वार्टर फायनलमध्ये

डोमिनिक थिएम व डॅनियल मेदवेदेवने सरळ सेटमध्ये विजय मिळवत पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आॅस्ट्रियाचा दुसरा मानांकित थिएमने कॅनडाच्या १५ व्या मानांकित फेलिक्स एगुर अलीसामीला ७-६, ६-१, ६-१ ने हरवले. दुसरीकडे, तिसऱ्या मानांकित रशियाच्या मेदवेदेवने अमेरिकेच्या फ्रान्सिस टिफोऊला ६-४, ६-१, ६-० ने हरवले. ही लढत एक तास ३८ मिनिटे चालली. पुरुष गटात यंदा नवा चॅम्पियन दिसेल. भारताच्या रोहन बोपन्नाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.

पुरुष एकेरी : क्वार्टर फाइनल लढती

1. बोरना कोरिच ज्वेरेव

2. पाब्लो बुस्ता शापोवालोव

3. आंद्रेई रुब्लेव मेदवेदेव

4. अॅलेक्स डी मिनाउर थिएम

महिला एकेरी: क्वार्टर फायनल लढती

1. जेनिफर ब्रेडी युलिया पुतिंतसेवा

2. नाओमी ओसाका शेल्बी रॉजर्स

3. सेरेना विल्यम्स पिरोनकोवा

4. अझारेंका अॅलिसा मर्टेंस

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser