आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • US Open : Naomi Osaka Second time Champion, Winning Each Grand Slam Final; Osaka Defeated Azarenka 1 6, 6 3, 6 3 In 3 Sets

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूएस ओपन:नाओमी ओसाका दुसऱ्यांदा विजेती, प्रत्येक ग्रँडस्लॅम फायनल जिंकत ठरली चॅम्पियन; ओसाकाने अझारेंकाला 3 सेटमध्ये 1-6, 6-3, 6-3 ने हरवले

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला सेट गमावल्यानंतर किताब जिंकणारी 26 वर्षांतील पहिली खेळाडू

जपानची टेनिसपटू नाओमी आसोका दुसऱ्यांदा यूएस ओपन चॅम्पियन बनली. चौथ्या मानांकित ओसाकाने बेलारुसच्या बिगर मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाला १-६, ६-३, ६-३ ने हरवले. २२ वर्षीय ओसाकाचा करिअरमधील तिसरा ग्रँड स्लॅम किताब ठरला. ते जेव्हा ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचली, तेव्हा चॅम्पियन बनली. तिने २०१८ यूएस ओपन व २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. या विजयामुळे ओसाकाला २२.०५ काेटी रुपयांचे बक्षीस व २ हजार रेटिंग गुण मिळाले. आेसाका पहिला सेट २६ मिनिटांत १-६ ने हारली. त्यानंतर सलग २ सेटसह किताब जिंकला. ओसाका पहिला सेट गमावल्यानंतर चॅम्पियन बनणारी २६ वर्षांतील पहिली खेळाडू बनली.

> सामन्यानंतर कोबे ब्रायंटची जर्सी घालते, म्हटले - मला त्यामुळे शक्ती मिळते : आसोका प्रत्येक सामन्यानंतर कोबे ब्रायंटची लॉस अँजेलिस लेकर्सची ८ नंबरची जर्सी घालते. ती म्हणते, त्यामुळे मला शक्ती मिळते. ओसाका १२ वर्षीय कृष्णवर्णीय बालक तामिर राइसचे नाव लिहलेले मास्क घालून उतरली होती.

> ४० वर्षांनी पहिल्यांदा उपांत्य-अंतिम फेरीत ३ सेटपर्यंत चालली : यूएस ओपनमध्ये ४० वर्षांनी पहिल्यांदा उपांत्य व अंतिम सामना ३ सेटपर्यंत चालला. उपांत्य सामन्यात ओसाकाने ब्राडी व अझारेंकाने सेरेनाला ३ सेटमध्ये पराभूत केले होते. अझारेंकाची २०१३ नंतर ही पहिली ग्रँड स्लॅम फायनल होती.

मी पहिल्या सेटमध्ये थोडी निराश होते. आपले उत्कृष्ट प्रदर्शन करू शकणार नाही, असे वाटत होते. अनेक गोष्टी डोक्यात सुरू होत्या. मला वाटले, एका तासात पराभूत होणे लज्जास्पद असेल. त्यामुळे मी प्रयत्न करण्याचे निश्चित केले. - नाओमी ओसाका

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser