आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Usain Bolt Corona Virus Tests Positive For COVID 19 Usain Bolt 34th Birthday Party In Jamaica Video Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:धावपटू हुसेन बोल्टला वाढदिवस साजरा करने पडले महागात, पार्टीनंतर झाली कोरोनाची लागण; बोल्ट म्हणतो...

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 वेळा वर्ल्ड चॅम्पियन उसेन बोल्टने 2017 मध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर संन्यास घेतला होता

जगातील वेगवान धावपटू जमैकाचा उसैन बोल्ट (34) याला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोल्टने 21 ऑगस्ट रोजी 34 वा वाढदिवस जमैकात साजरा केला होता. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान बोल्टने एक व्हिडिओ शेअर करत या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

11 वेळा विश्वविजेता राहिलेल्या बोल्टने 2017 मध्ये लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर संन्यास घेतला होता. शेवटच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ही उसेन बोल्टच्या वाढदिवसाची पार्टी आहे. यामध्ये सोशल डिस्टेंसिंग पाळण्यात आले नाही तसेच कोणीही मास्क घातलेले नाही.

पार्टीत जमैकाचे फुटबॉलर स्टर्लिंग देखील सामील होते

डेली मेलने जमैकाचे रेडियो स्टेशन 'नॅशनल वाइड 90एफएम'च्या हवाल्याने लिहिले की, बोल्टच्या बर्थडे पार्टीत परिवार आणि इतर पाहुण्यांसोबत इंग्लंडच्या फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे खेळाडू रहीम स्टर्लिंग देखील सहभागी झाला होता. या पार्टीनंतर बोल्टचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्टर्लिंगही जमैकाचा रहिवासी आहे.

बोल्टला कोरोना रिपोर्टची प्रतिक्षा

बोल्टने व्हिडिओ जारी करत म्हटले की, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. मी शनिवारी कोरोनाची चाचणी केली आहे. जबाबदारीच्या नात्याने मी घरातच आहे. मित्रांपासून दूर आहे. आतापर्यंत मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन करत आहे. मला कोरोनाच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. जोपर्यत याची पुष्टी होत नाही तोपर्यंत मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की, सुरक्षित राहा, आरामात राहा.

बोल्टच्या नावावर 100 मीटर स्पर्धेत जागतिक विक्रमाची नोंद

बोल्टने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 9.58 सेकंद आणि 200 मीटर स्पर्धेत 19.19 सेकंदात पूर्ण केली होती. हा एक जागतिक विक्रम आहे. बोल्टने सलग 3 ऑलम्पिक 8 सुवर्णपदक जिंकले आहेत. यापैकी 2008 बीजिंग ऑलम्पिकमध्ये 2, तर 2012 लंडन ऑलम्पिक आणि 2016 रियो ऑलम्पिकमध्ये प्रत्येकी 3 सुवर्णपदक पटकावले आहेत.