आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारबाजी:वैष्णवी, श्रेया, तनुजाने जिंकले सुवर्ण

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) व भारतीय तलवारबाजी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित खेलो इंडिया दस का दम तलवारबाजी स्पर्धेत वैष्णवी कावळे, श्रेया घुले आणि तनुजा लहाने यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले. विद्यापीठ परिसरातील साई येथे आयोजित स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरसह बीड, परभणी, धुळे, लातूर येथील एकूण १०० महिला खेळाडू विविध वयोगटात सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी हॉकी महाराष्ट्राचे पंकज भारसाखळे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, सहसचिव डॉ. पांडुरंग रणमाळ यांची उपस्थिती होती. स्पर्धा प्रमुख म्हणून तुषार आहेर यांनी काम पाहिले.

विजेते खेळाडू : १२ वर्षे मुली फॉइल - वैष्णवी कावळे (सुवर्ण), समृद्धी साखला (रौप्य), स्वामिनी डोंगरे, उमा डोंगरे (कांस्य). इप्पी - श्रेया घुले, सौम्या साठे, समृद्धी शेप, समृद्धी गायकवाड. सेबर - तनुजा लहाने, श्रेया मोईम, श्रावणी शिंदे, भक्ती सोनवणे.

बातम्या आणखी आहेत...