आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Vasu Sojitra News | A 30 year old Indian Native Has Scaled The World's Tallest Mountain On One Foot

दुर्गम पर्वताराेहण आणि स्कीइंगच्या आव्हानात्मक कसरती:मूळ भारतीय 30 वर्षांच्या साेजित्राने एका पायावर सर केला जगातील सर्वात माेठा पर्वत

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षमता दुबळेपण नाही हेच सिद्ध करण्यासाठी दुर्गम पर्वताराेहण आणि स्कीइंगच्या आव्हानात्मक कसरती

वासू सोजित्रा दिव्यांग खेळाडू

अक्षमता हे दुबळेपणाचे लक्षण नाही, हेच सिद्ध करण्यासाठी मुळ भारतीय वंशाच्या ३० वर्षीय वासू साेजित्राने एका पायावर अपूर्व अशी कामगिरी केली. त्याने जगातील सर्वात उंच आणि आव्हानात्मक मानल्या जाणारे पर्वत सर केले. यादरम्यान त्याने या ठिकाणी यशस्वीपणे पर्वताराेहणासह साेबतच स्कीअर, स्केटबाेर्डरच्याही आव्हानात्मक कसरती केल्या आहेत. त्याची ही कामगिरी लक्षवेधी ठरली. साेजित्रा ९ महिन्यांचा असताना सेप्टीसीमिया (रक्ताचा आजार) या दुर्धर आजाराने बाधित झाला हाेता. त्यामुळे त्याला एक पाय गमावावा लागला. मात्र, त्याने एका पायावरही जग जिंकता येते, हा आत्मविश्वास कायम ठेवला. त्याला चालता यावे यासाठी घरच्यांनी कृत्रिम पायही लावला हाेता. मात्र, त्याचा त्याला तितकासा फायदा झाला नाही. त्यामुळे त्याने याचा कधीही आधार घेतला नाही. ताे सामान्य गटातून सहकाऱ्यासाेबत फुटबाॅल, पर्वताराेेहण आणि स्कीइग करू लागला. सुरुवातीला त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, यावर मात करण्याची शैली त्याने आत्मसात केली. यातून ताे यामध्ये प्राेफेशनल खेळाडू म्हणून नावारुपास आला. त्याची हीच जिद्द सामान्य गटातील युवांना प्रेरणादायी ठरत आहे.

‘दिव्यांगतेची अक्षमता हे दुबळेपणाचे लक्षण नाही, हेच मला सिद्ध करून दाखवायचे हाेते. यासाठी मी एका पायावर जगातील सर्वात माेठा आणि उंच असा पर्वत सर करण्याचे टार्गेट समाेर ठेवले. यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, हेच दुर करत मी ही माेहिम फत्ते केली’, असे साेजित्राने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...