आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:व्हिक्टर, ताई यिंग ठरले चॅम्पियन

जकार्ता7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेन्मार्कच्या अव्वल मानांकित व्हिक्टर अलेक्सनने रविवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये चीनच्या झाओ जुन पेंगला पराभूत केले. त्याने २१-९, २१-१० अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने दुसऱ्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच डेन्मार्कच्या अलेक्सनने सलग तिसऱ्यांदा आणि ओव्हरआॅल पाचव्यांदा झाओला धूळ चारली. यामुळे चीनच्या बॅडमिंटनपटूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने सर्वाेत्तम खेळीने विजयी माेहिम कायम ठेवताना फायनल गाठली हाेती. मात्र, त्याला या सामन्यात आपली लय कायम ठेवता आली नाही. तसेच महिला एकेरीच्या गटात तैवानची ताई यिंग ही किताबाची मानकरी ठरली. तिने चीनच्या वांगचा पराभव केला. तिने २१-२३, २१-६, २१-१५ ने अंतिम सामना जिंकला. पहिल्या गेममधून अपयशातून सावरत ताई यिंगने दमदार पुनरागमन करताना सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...