आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Victory Salute Of Indian Women's Team; Beat Sri Lanka For The 17th Time | Marathi News

आशिया कप:भारतीय महिला संघाची विजयी सलामी; श्रीलंकेवर 17 व्यांदा मात

सिलहट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर जेमीमा राॅड्रिग्ज (७६) आणि युवा गाेलंदाज हेमलता (३ बळी) यांनी भारतीय महिला संघाचा आशिया कपमध्ये सलामीला विजय साजरा केला. हरमनप्रीतच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शानदार विजयी सलामी दिली. भारताने सलामीला चार वेळच्या उपविजेत्या श्रीलंका टीमचा पराभव केला. सहा वेळच्या किताब विजेत्या भारतीय संघाने ४१ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने करिअरमध्ये श्रीलंकेवर १७ वा विजय साजरा केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या माेबदल्यात १५० धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाचा १८.२ षटकांत अवघ्या १०९ धावांवर धुव्वा उडाला. श्रीलंका संघाकडून हसिनी परेराने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. इतर आठ फलंदाज एकेरी धावांवर बाद झाल्या. भारताकडून हेमलताने सर्वाधिक तीन बळी घेतले. पुजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

जेमिमाचे आठवे अर्धशतक : भारतीय महिला संघाची युवा फलंदाज जेमीमा राॅड्रिग्जने शानदार अर्धशतकी खेळी केली. तिने १४३.३९ च्या स्ट्राइक रेटने ५३ चेंडूंत ११ चाैकार आणि एका षटकारासह ७६ धावा काढल्या. यासह तिने करिअरमध्ये आठव्या अर्धशतकाची नाेंद केली.

गतचॅम्पियन बांगलादेश विजयी
गतचॅम्पियन यजमान बांगलादेश संघाने घरच्या मैदानावर धडाकेबाज विजयी सलामी दिली. बांगलादेश टीमने सलामीला थायलंडवर ९ गड्यांनी मात केली.

बातम्या आणखी आहेत...