आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli And Babrasmaer Spin Challenge, Sri Lanka Afghanistan Opening Match Will Be Played Today

आशिया कप:विराट काेहली व बाबरसमाेर फिरकीचे आव्हान, आज श्रीलंका-अफगाणिस्तान सलामी सामना रंगणार

हिमांशू पारिक | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूएईमध्ये टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. आशियातील सर्वात बलाढ्य आणि चॅम्पियन संघ या स्पर्धेतून निश्चित हाेणार आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांमध्ये स्पर्धेचा सलामी सामना हाेणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे यंदा या सर्वच संघांमध्ये आशिया कप जिंकण्यासाठी माेठी चुरस रंगणार आहे. कारण, यंदाच्या सत्रात सर्वच संघांची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे.

या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या रविवारी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली आहे. यादरम्यान विराट काेहली पुन्हा एकदा झंझावाती खेळी करण्यासाठी उत्सुक आहे. पाकचा कर्णधार बाबर आझमही सध्या फाॅॅर्मात आहे.

27 सामने राेहितने खेळले आशिया कपमध्ये. ताे जयवर्धनेलाही (२८) मागे टाकेल. 936 धावा राेहितने पाच आशियाई संघाविरुद्ध काढल्या आहेत. यात पाक, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग टीमचा समावेश.

1. विराट कोहली Vs हसरंगा
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट काेहलीसाठी काही प्रमाणात फिरकीची गाेलंदाजी डाेकेदुुखी ठरलेली आहे. मात्र, आयपीएलमध्ये काेहलीने आपल्याच बंगळुरू संघातील लेग स्पिनर हसरंगाच्या चेंडूंचा यशस्वीपणे सामना केला. आता हसरंगा हा आशिया कपमध्ये श्रीलंका संघाचे नेतृत्व करत आहे. काेहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यात हसरंगाच्या सहा चेंडूंचा सामना करताना ४ धावा काढल्या आहेत.

2. राशिद खान Vs बाबर आझम
पाकचा कर्णधार बाबर टी-२० मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. मात्र, त्याच्यासाठीही फिरकीचे जाळे हे आव्हानात्मक आहे. ताे फिरकीपटूंच्या चेंडूवर समाधानकारक खेळी करू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासमाेर राशिद खानसारख्या तरबेज फिरकीपटूचे माेठे अाव्हान असेल. आतापर्यंत राशिदने पाच वेळा बाबरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. पाचही सामन्यांत राशिदने बाबरची विकेट घेतली.

3. हार्दिक Vs मुशफिकूर
हार्दिक आणि मुशफिकूर यांच्यातील झंुज ही आकडेवारीपेक्षा गत सामन्यातील सर्वाेत्तम कामगिरीमुळे अधिकच चर्चेत आहे. हे दाेन्ही खेळाडू २०१६ च्या टी-२० वि‌श्वचषकात समाेरासमाेर हाेते. बांगलादेशला शेवटच्या षटकात सहा चेंडूंत ११ धावांची गरज हाेती. मुशफिकूरने हार्दिकच्या चेंडूवर सलग दाेन चाैकार खेचून विजयी जल्लाेष सुरू केला. मात्र, त्यानंतर दाेन चेंडूंवर हार्दिकने दाेन विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. भारताने हा सामना जिंकला. आता सहा वर्षांनंतर हे दाेन्ही गाेलंदाज समाेरासमाेर असतील.

4. रोहित शर्मा Vs शाकिब
टीम इंडियाचा राेहित व बांगलादेशचा शाकीब हे यंदा कर्णधाराच्या भूमिकेत आशिया कपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यात चुरस रंगणार आहे. यादरम्यान राेहितच्या माेठ्या खेळीत सातत्याने शाकीबचा माेठा अडसर ठरला आहे. कारण, आतापर्यंतच्या पाचही सामन्यांत राेहितला या गाेलंदाजाविरुद्ध माेठी खेळी करता आली नाही. शाकिबने आतापर्यंत राेहितला ३९ चेंडू टाकले आहेत. यात राेहितने चार चाैकारांसह ३९ धावा काढल्या आहेत. राेहित हा २००९ मध्ये फक्त एकदाच शाकिबकडून बाद झाला हाेता.

5. लाेकश राहुल Vs राशिद खान
स्फाेटक युवा फलंदाज लाेकेश राहुल आणि करामती राशिद खान यांच्यातील चुरस चाहत्यांसाठी माेठी पर्वणीच ठरणार आहे. राहुलमध्ये प्रतिस्पर्धी संघांची गाेलंदाजी फाेडून काढण्याची माेठी क्षमता आहे. मात्र, राशिद खानविरुद्ध ताे काहीसा अपयशी ठरताे. त्याने आतापर्यंत राशिदच्या चेंडंूवर १२० पेक्षाही कमी स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत. राशिदच्या ४३ चेंडूंवर लाेकेश राहुलने फक्त ३३ धावांची कमाई केली. तसेच तीन वेळा ताे बादही झाला.

बातम्या आणखी आहेत...