आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli And Sunil Chhetri Instagram Chatting News | Virat Says Father Did Not Pay Bribe For Selection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:विराट म्हणताे- निवड हाेण्यासाठी वडिलांनी लाच दिली नाही; म्हणाले- मेहनत कर, दुसरे करणार नाहीत ते करून दाखव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊननिमित्ताने फुटबाॅलपटू सुनील छेत्रीने इन्स्टाग्रामवर मारल्या विराटशी गप्पा

भारतीय फूटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने लाॅकडाऊनच्या निमित्ताने क्रिकेटचा कर्णधार विराट काेहलीबराेबर इन्स्टाग्रामवर एक तास मनसाेेक्त गप्पा मारल्या. विराट म्हणाला, एक काळ असाही हाेता की माझ्या वडिलांनी ज्युनियर स्टेट संघाची निवड करण्यासाठी लाच घेण्यास नकार दिला हाेता. निवडकर्ते त्यांना म्हणाले, गुणवत्तेचा प्रश्न नाही, तुम्हाला काहीतरी (बहुधा लाच) करावे लागेल. याचा नेमका अर्थ माझ्या वडिलांना कळला नाही. यशस्वी वकिलीसाठी आयुष्यभर मेहनत करणारे ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हाेते. ते निवडकर्त्यांना इतकेच म्हणाले, विराटची निवड करायची असेल तर ती गुणवत्तेच्या आधारावरच करा. मी काही देऊ शकणार नाही. निवड न झाल्याने मी खूप रडलाे. खचून गेलाे. पण वडिलांच्या या गाेष्टी मला खूप काही शिकवून गेल्या. यश प्राप्त करायचे तर अनन्यसाधारण बनावे लागेल याची जाणीव झाली. शिखर गाठायचे तर अशी गाेष्ट कर की जी काेणीही केली नाही व ती मेहनतीने आत्मसात कर असे ते म्हणायचे. हे शब्द मनावर कायमचे काेरले गेले. मग काय स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी झाेकून दिले. छेत्रीने संस्मरणीय क्षणांबद्दल छेडताच विराट म्हणाला, १९९६च्या विश्वचषकात व्यंकटेश प्रसादने आमिर साेहेलची घेतलेली विकेट सर्वात संस्मरणीय आठवण असून ताे माझ्या जीवनातील एक सुवर्णक्षण हाेता.

अनुष्काची साथ असेल तर बायाेपिकमध्ये काम करेन

बायाेपिकसाठी माझी तयारी आहे, पत्नी अनुष्कानेही या चित्रपटात काम करावे असे विराट म्हणाला. आज माझे जे व्यक्तीमत्व आहे, त्याचे बहुतांश श्रेय मी अनुष्काला देईन. तिची भेट हाेण्याआधी मी खूप आत्मकेंद्रीत हाेताे, माझ्याच कंफर्ट झाेनमध्ये रहायाचाे. माझे जे काही व्यक्तीमत्व आहे त्यात चांगला बदल करण्याची गरज असल्याची अनुभूती मला अनुष्कामुळे मिळाली असे त्याने आवर्जून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...