आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T20 Match India Vs Austrolia | Virat Kohli Best Batsman At Home Against Australia; Tough Road Ahead For Captain Rahit | Marathi News

आज सलामीचा टी-20 सामना:ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर विराट काेहली सर्वाेत्तम फलंदाज; कर्णधार राेहितसाठी खडतर वाट

माेहाली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान टीम इंडिया आता विश्वचषकाची आपली माेहीम फत्ते करण्याच्या तयारीसाठी आजपासून आपल्या घरच्या मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान टीम इंडिया आणि पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. याच मालिकेतील सलामी सामना आज माेहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हाेणार आहे. यंदा टी-२० फाॅरमॅटचा विश्वचषक १६ ऑक्टाेबरपासून ऑस्ट्रेलियात हाेणार आहे.

याच विश्वचषकाच्या तयारीसाठी ही टी-२० मालिका महत्त्वपूर्ण मानली जाते. या मालिकेच्या माध्यमातून या दाेन्ही संघांना आगामी वर्ल्डकपची कसून तयारी करता येणार आहे. माजी कर्णधार विराट काेहली, कर्णधार राेहित शर्मा व लाेकेश राहुल हे त्रिकुट तब्बल १८ महिन्यांनंतर घरच्या मैदानावर टी-२० सामन्यादरम्यान एकत्र खेळताना दिसणार आहे.

राेहितला फलंदाजीचा दर्जा उंचवावा लागणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ सामन्यांत १६ च्या सरासरीने धावा काढता आल्या. यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट काेहली हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतचा सर्वाेत्तम फलंदाज ठरला.

धाेनीच्या अनुपस्थितीत भारताची घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली मालिका
माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीविना टीम इंडिया पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. यापूर्वी टीम इंडियाने ७ टी-२० सामने खेळले. यात त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या नावे तीन विजयांची नाेंद आहे. त्याची यादरम्यानची कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती.

लक्ष्यचा पाठलाग करणाऱ्या संघाचा १००% विजय निश्चित; भारताचे आतापर्यंत ४ विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यादरम्यान लक्ष्यचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला. त्यामुळे आताही विजयाचे हेच समीकरण जवळपास निश्चित मानले जात आहे. दाेन्ही संघांत आतापर्यंत एकूण सात सामने झाले. यातील चार सामन्यांत भारतीय संघाने पाठलाग करताना शानदार विजय साकारले आहेत. तसेच तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी केल्यावर टीम इंडियाचा पराभव झाला. तसेच माेहालीच्या मैदानावर झालेल्या पाचपैकी तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांत लक्ष्यचा पाठलाग करणारा संघ विजेता ठरला.

कार्तिक, ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवा : माजी कर्णधार गावसकरांचा सल्ला
येत्या १६ ऑक्टाेबरपासून टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. मात्र, अद्याप दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दाेघांची भारतीय संघातील भूमिका स्पष्ट झालेली नाही. याबाबत अद्यापही कर्णधार राेहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड अनभिज्ञ आहेत. त्यामुळे कार्तिक आणि ऋषभ या दाेघांनाही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणे फायदेशीर ठरेल, असा सल्ला भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...