आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीमचे ओपनर रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीसोबतच विराट कोहली आणि हार्दिक पंड्यावरही कोरोना प्रोटोकॉल तोडण्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत. ऑस्ट्रेलियातील मीडियाने एक फोटो शेअर करत दावा केला होता की, कोहली आणि पंड्या वनडे सीरीजदरम्यान एका दुकानात गेले होते. फोटो सिडनीच्या बेबी व्हिलेजच्या एका बेपी स्टोरचा होता.
आता बेबी स्टोरच्या मालकाने ऑस्ट्रेलियाई मीडियावर भ्रामक मृत्त पसरवण्याचा आरोप लावला आहे. बेबी व्हिलेजचे मालक नाथन पोंग्रासने म्हटले की, ऑस्ट्रेलिया मीडियाचा रिपोर्ट लज्जास्पद आहे. त्यांनी म्हटले की, कोहली आणि पंड्याने कोणत्याही प्रोटोकॉलचे उल्लंघन केलेले नाही. ज्यावेळचा (7 डिसेंबर) हा फोटो आहे, त्यावेळी न्यू साउथ वेल्समध्ये कोणताही निर्बंध नव्हता.
कोहली आणि पंड्याच्या वेळी सिडनीमध्ये केस नव्हत्या
नाथनने म्हटले, 'कोहली आणि पंड्या स्टोरमध्ये आले आणि काही वेळ घालवला. त्यावेळी न्यू साउथ वेल्समध्ये कोणतेही निर्बंध नव्हते. आम्हाला त्यांना गिफ्ट द्यायचे होते. मात्र त्यांनी ऐकले नाही आणि सांगितले की, सर्व सामनांचे पैसे देतील. ते आमच्यासोबत खूप चांगले वागले. त्यांनी आमच्या स्टाफसोबत बातचित केली. दोघेही खूप चांगले आहेत.'
अभिमान वाटला म्हणून सोशल मीडियावर फोटो शेअर केला
नाथन म्हणाले, 'कोहली आणि पंड्या यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढला. आम्ही तो सोशल मीडियावर शेअर केला कारण आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, त्यांनी शॉपिंगसाठी आमच्या स्टोरची निवड केली. आमच्या स्टाफला त्यांना स्पर्श करण्याची किंवा हात मिळवण्याची परवानगी नव्हती. दरम्यान सिडनीमध्ये त्या काळात कोणतेही निर्बंध नव्हते.'
सिडनीमध्ये 50 मधून केवळ 1 व्यक्तीने मास्क घातले होते
नाथन यांनी म्हटले, 'या दरम्यान दोन्ही प्लेयर्सने मास्कही घातले नव्हते. मी जसे म्हणालो होतो की, त्यावेळी सिडनीमध्ये कोरोनाचे प्रकरणे नव्हते. त्या काळात सिडनीमध्ये 50 मधून केवळ 1 व्यक्ती मास्क घालत होता. मी तर केवळ वयस्कर व्यक्तींना मास्क घातलेले बघितले. प्रेग्नेंट महिलांनाही मी मास्क घातलेले पाहिलेले नाही.'
ऑस्ट्रेलिया मीडियाच्या रिपोर्ट्स लाजिरवाणे
नाथन यांनी म्हटले की, त्यांनी आणि स्टोरच्या स्टाफने कोहली आणि पंड्यासोबत चांगला वेळ घालावला. त्यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलिया मीडियामध्ये याविषयी जे काही घडले ते खूप लाजिरवाने होते. ऑस्ट्रेलिया मीडिया रिपोर्ट्सनुसार न्यू साउथ वेल्समध्ये गेमिंग रुम, हेअर सलून आणि दुकान सारख्या इंडोर वेन्यूमध्ये 3 जानेवारीनंतर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. तर तिथे कोरोनाचे प्रकरण मिड डिसेंबरपासून वाढत आहेत.
20 दिवसांनंतर उघडले ऑस्ट्रेलियातील मीडियाचे डोळे
सिडनी मॉर्निंग हेराल्डने 2 जानेवारीला कोहली आणि पंड्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यायवर बायो बबल उल्लंघनाचा आरोप लावला होता. हा खूप आर्श्चर्यकारक आहे की, ऑस्ट्रेलिया मीडियाचे डोळे 20 दिवसांनंतर उघडले. पंड्या आणि कोहली 20 दिवसांपूर्वीच भारतात परतले आहेत. यानंतर त्यांनी अशा प्रकारचे आरोप रोहितसह 5 भारतीय खेळाडूंवरही लावले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.