आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli T20I Captaincy Reactions; Here's How Cricket Fans Reacted On Twitter; News And Live Updates

कर्णधारपद सोडल्याने लोक आनंदी:ट्विटरवर ट्रेंड करत आहे गुड डिसिजन, रोहित शर्माला टी-20 चे कर्णधार करण्याची मागणी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक कोहलीच्या निर्णयाला सांगत आहे गुड डिसिजन

विराट कोहलीने टी-20 सामन्यांचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. 17 ऑक्टोबरपासून होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, विराट कोहलीकडे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद कायम राहणार आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे, विराट कोहलीने कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करताच सोशल मीडियावर प्रंचड धुमाकूळ सुरु झाला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले असून इतर क्रिकेटप्रेमी हा चांगला निर्णय असल्याचे सांगत आहे.

लोक कोहलीच्या निर्णयाला सांगत आहे गुड डिसिजन
विराट कोहलीच्या या निर्णयानंतर ट्विटरवर सध्या गुड डिसिजन (Good Decision) हे ट्रेंड करत आहे. अनेक लोक या निर्णयाचे समर्थन करत आहे. अनेक युझर्स नवीन कर्णधाराच्या आगमनाने टी -20 क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी अधिक चांगली होईल असे म्हणत आहे. तर दुसरीकडे, काही लोक कोहली आता त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल असे म्हणत आहे.

ट्विटरवर किंग कोहलीही ट्रेंड
ट्विटरवर किंग कोहलीही ट्रेंड करत आहे. विराट कोहलीने हा धाडसी निर्णय घेतल्याचे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये कोहलीचे योगदान कधीही विसरले जाणार नाही असेही एका युझर्सने म्हटले आहे.

कोहलीच्या प्रत्येक निर्णयासोबत - चाहता
एका क्रिकेट चाहत्याने ट्विट करून म्हटले की, मी कोहलीच्या प्रत्येक निर्णयाशी ठाम असून त्यानी हा योग्य निर्णय घेतला आहे. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. तर दुसरीकडे, एका क्रिकेट चाहत्याने त्याच्या निर्णयाचे समर्थन केले असून त्याचे आभार मानले आहे.

रोहित शर्माला टी -20 चे कर्णधार बनवण्याची मागणी
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, विराट कोहलीनंतर रोहित शर्माला टी -20 चे कर्णधार बनवले जाऊ शकते. विशेष म्हणजे रोहित शर्माचे नावही ट्विटरवर ट्रेंड करत आहे. लोक रोहित शर्माला टी-20 चे कर्णधार बनवण्याची मागणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...