आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Virat Kohli Will Go On Paternity Leave, India Vs Australia 2020 T20I, ODI And Test Squads For Tour Of Australia

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल:पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटरनिटी लीव्हवर जणार विराट कोहली, रोहितला टेस्ट आणि सॅमसनला वनडेमध्ये संधी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला कसोटी संघात सामील करण्यात आले आहे. BCCI सचिव जय शाह यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. तर, कर्णधार कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर पॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे.

दरम्यान, संजू सॅमसनला टी-20 नंतर वन-डे संघातही संधी मिळाली आहे. तर, वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे औस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर गेला आहे. वेगवान गोलंदाज टी नटराजनला चक्रवर्तीच्या जागी टी-20 संघात सामील करण्यात आले आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3-3 वन-डे आणि टी-20 नंतर 4 कसोटी सामने खेळेल.

रोहित शर्माला संधी

BCCI च्या मेडिकल टीमने रोहितच्या फिटनेसचा आढावा घेऊन त्याला लिमिटेड ओव्हर्सच्या सीरीजमधून आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कसोटी सीरीजमध्ये रोहितला संधी देण्यात आली आहे.

हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे IPL मधील मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा काही सामन्यातून बाहेर गेला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचे सलेक्शनही केले नव्हते. परंतू, आता रोहित फीट झाला असून, आयीपएलमध्ये दुखापतीनंतर दोन सामनेही खेळला आहे. आयपीएलनंतर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल.

टी-20 टीम: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल (उपकर्णधार, विकेटकीपर), मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेय, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन.

वन-डे टीम: विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, केएल राहुल (उपकर्णधार, विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकुर आणि संजू सॅमसन (विकेटकीपर).

टेस्ट टीम: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

सामनातारीखठिकाण
1st ODI (डे नाइट)27 नोव्हेंबरसिडनी
2nd ODI (डे नाइट)29 नोव्हेंबरसिडनी
3rd ODI (डे नाइट)2 डिसेंबरकैनबरा
1st T20 ( नाइट)4 डिसेंबरकैनबरा
2nd T20 (नाइट)6 डिसेंबरसिडनी
3rd T20 (नाइट)8 डिसेंबरसिडनी
1st Test (डे नाइट)17-21 डिसेंबरएडिलेड
2nd Test26-30 डिसेंबरमेलबोर्न
3rd Test07-11 जानेवारीसिडनी
4th Test15-19 जानेवारी​​​​​​​ब्रिस्बेन
बातम्या आणखी आहेत...