आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा:विश्वनाथन आनंदचा सलग दुसऱ्यांदा कार्लसनवर विजय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने पुन्हा एकदा सर्वाेत्तम चालीच्या बळावर सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला धूळ चारली. त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सोमवारी शानदार विजयाची नोंद केली. भारताच्या ५२ वर्षीय या बुद्धिबळपटूने पाचव्या फेरीत कार्लसनला पराभूत केले. या दाेघांमधील क्लासिकल सामना ४० व्या चालीवर बरोबरीत राहिला हाेता. त्यानंतर आनंदने सडन डेथमध्ये ५० व्या चालीवर विजयाला गवसणी घातली. आनंदच्या नावे १० गुणांची नोंद झाली. त्यामुळे त्याला गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवता आले. आनंदची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...