आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Volleyball League : New Teams Will Be Added To The 15,5 Million Volleyball League, Prize Money Will Be Doubled

दिव्य मराठी विशेष:15.5 कोटींच्या प्रो व्हॉलीबॉल लीगमध्ये दोन नव्या संघांचा समावेश, कोरोना कमी असलेल्या राज्यात हाेणार सामने

विशाल भदाेरिया | ग्वाॅलियर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळ, राजस्थान किंवा तामिळनाडूत लढती, यंदा सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण हाेणार
Advertisement
Advertisement

कोविड-१९ महामारीदरम्यान व्हॉलीबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. पुन्हा एकदा त्यांना प्रो व्हॉलीबॉल लीगचे (पीव्हीएल) सामने पाहायला मिळतील. पीव्हीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने तयारी सुरू केली. साडेपंधरा कोटी रुपयांची ही लीग पहिल्यांदा ७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२० पर्यंत झाली होती. पहिल्या सत्रातील उपांत्य व अंतिम सामना ५ कोटी लोकांनी पाहिला होता. क्रिकेटनंतर पहिल्यांदा सर्वाधिक संख्येने व्हॉलीबॉलला व्ह्यूअरशिप मिळाली होती. गेल्या वेळची लोकप्रियता पाहता यंदा सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाऊ शकते. मनोरंजनासाठी काही मोठे बदल केले जाऊ शकतील. यंदा दोन नव्या संघांना खेळण्याची संधी मिळू शकते. म्हणजे ६ नाही, तर ८ संघ चॅम्पियन बनण्यासाठी भिडतील.

अडीच कोटी रुपयांच्या बक्षिसाचा हाेणार वर्षाव

चॅम्पियनला आता १ कोटी आणि उपविजेत्याला ५० लाख बक्षीस रक्कम दिली जाईल. पहिल्या सत्रातील विजेत्याला ५० लाख आणि उपविजेत्याला ३० लाख रुपये मिळतील.

यंदा १२ नव्हे, १६ विदेशी खेळाडू लीगमध्ये सहभागी

८ संघांत एकूण १६ विदेशी खेळाडू खेळताना दिसतील. प्रत्येक संघात २ विदेशी खेळाडू असतील. त्यासह राष्ट्रीय संघातील ५ वरिष्ठ व ५ कनिष्ठ खेळाडू राहतील. प्रत्येक संघात एकूण १२ खेळाडू असतील.

ब्रॉडकास्टिंग याबाबत सध्या माध्यमांशी चर्चा

सर्व सामन्यांचे थेट प्रसारण करण्याची तयारी आहे. यंदा सर्व सामने दाखवण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे चाहते घरी बसून पाहतील. त्यासाठी माध्यमांशी प्रक्षेपणाबाबत चर्चा सुरू आहे. जुलै-ऑगस्टमध्ये बैठक अाहे. रामलाल वर्मा, उपाध्यक्ष, भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशन

Advertisement
0