आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Wales Qualify For World Cup For First Time Since 1958; Fans Support Wales Team From Spain, Qatar Expensive, Stay In Tenerife Due To Beer Ban

वेल्स 1958 नंतर पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र:चाहत्यांचे स्पेनमधून वेल्स टीमला पाठबळ

जॅक विलियम्सन| टेनेरिफ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कतार महागडे, बिअरवरही बंदीमुळे टेनेरीफमध्ये मुक्काम

कतारमध्ये सध्या फिफाची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत वेल्सचाही संघ सहभागी झाला आहे. मात्र, कतारमध्ये विश्वचषकादरम्यान बिअरच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच वेल्सच्या चाहत्यांनी थेट स्पेन गाठलेे आहे. ‘कतार हे शहर अधिकच महागडे आहे आणि या ठिकाणी बिअरवर बंदी घातली. त्यामुळे आम्ही आता स्पेनमधून आमच्या वेल्स संघाला पाठबळ देणार आहाेत, अशी प्रतिक्रिया वेल्सच्या फुटबाॅलप्रेमींनी दिली. यासाठी वेल्सचे चाहते हे सध्या स्पेनच्या टेनेरिफमध्ये माेठ्या संख्येत दाखल झाले आहेत. वेल्स संघाने तब्बल १९५८ नंतर फिफाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे स्थानिक चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, याच उत्साह आणि आनंदावर कतारमधील महागाई आणि बिअर बंदीच्या निर्णयाने विरजण पडले आहे. तरीही चाहत्यांनी आपला लाडक्या संघाला पाठबळ देण्यासाठी स्पेनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

‘आम्ही हातावरचे काम करणारे फुटबाॅलप्रेमी आहाेत. त्यामुळे कतार हे आमच्यासारख्यांना परवडणारे नाही. मात्र, आम्हीही वेल्स संघाला पाठबळ देण्यासाठी मागे हटणार नाहीत. यासाठी आम्ही थेट स्पेन गाठण्याचा निर्णय घेतला. येथील प्रवास आणि निवास हा आमच्या आवाक्यातला आहे. येथील खर्चही आमच्या खिशाला परवडणारा आहे, अशी प्रतिक्रिया पेंटरचे काम करणाऱ्या फुटबाॅलप्रेमी ली चॅम्बलेनने दिली.

टेनेरिफमध्ये वेल्सचे ४ हजार चाहते : स्पेनमधील खर्च हा आवाक्यातला आणि खिशाला परवडणारा असल्याने वेल्सचे फुटबाॅलप्रेमी टेनेरिफमध्ये दाखल झाले. याची संख्या ही जवळपास ४ हजारापेक्षा अधिक आहे. कतारमध्ये याच चाहत्यांना एका आठवड्यासाठी जवळपास ३.५० लाखांचा खर्च करावा लागणार हाेता.

बातम्या आणखी आहेत...