आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनरागमन:ऑस्ट्रेलियन टी-20 संघात वॉर्नर परतला

ब्रिस्बेन8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १६ सदस्यीय संघ जाहीर केला. डेव्हिड वॉर्नर, मार्क्स स्टोइनिस, मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क यांचे संघात पुनरागमन झाले आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताकडून २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सर्व खेळाडूंना भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. भारताविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या कॅमेरून ग्रीनलाही संघाने कायम ठेवले आहे. तो फिंचसोबत भारताविरुद्ध सलामीला आला होता.

संघ: अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, शॉन अ‍ॅबॉट, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क्स स्टोइनिस, मॅथ्यू वेड, अ‍ॅडम झम्पा.