आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Australian Opener Warner's Daddy Cool Avatar: Danced With Girls, Apologized To Fans For Bad Dance

ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरचा डॅडी कूल अवतार:मुलींसोबत केला डान्स, खराब डान्सबद्दल चाहत्यांची मागितली माफी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

IPL संपल्यानंतर कांगारूंचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. कुल डॅडी असलेला डेव्हिड वॉर्नर आपल्या मुलींसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. हे वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम आयडीवरून शेअर केला आहे.

लहान मुलगी इस्ला वॉर्नरनचा क्यूट डान्स

व्हिडिओ पोस्ट करत वॉर्नरने लिहिले की, मुलींनी पुन्हा एकदा मला त्यांच्या डान्समध्ये समाविष्ट केले. तथापि, माझ्या खराब डान्सिंग स्टेप्सबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. या व्हिडिओमध्ये, सर्वांची नजर वॉर्नरची धाकटी मुलगी इस्लावर आहे कारण ती दोन्ही मोठ्या बहिणींप्रमाणे नृत्य करण्यात पारंगत नाही पण ती डान्स करताना सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

व्हिडिओ सुरू होताच, लहान इस्ला तिच्या बहिणींना पाहून नाचण्याचा प्रयत्न करते. शेवटी, जेव्हा तिला कॉपी करता येत नाही तेव्हा ती फक्त टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करते. इस्लाची ही शैली पाहण्यासारखी आहे. वॉर्नरचा हा कौटुंबिक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडी वॉर्नरनेही व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, खूप छान इस्ला, फक्त बहिणींचे स्टेप बाय स्टेप फॉलो करत रहा.

डेव्हिड वॉर्नरची धाकटी मुलगी इस्ला वॉर्नर तिच्या मोठ्या बहिणींसोबत.
डेव्हिड वॉर्नरची धाकटी मुलगी इस्ला वॉर्नर तिच्या मोठ्या बहिणींसोबत.

वडिल लवकर बाद झाल्यावर मुली उदास दिसत होत्या

डेव्हिड वॉर्नरला त्याच्या मुलींवर खूप प्रेम आहे. याचे उदाहरण IPL च्या वेळी सुद्धा पाहायला मिळाले, जेव्हा वडिलांच्या लवकर बाद झाल्यानंतर मुली उदास दिसत होत्या. त्याचवेळी, मुलींनी वडिलांकडे तक्रार केली होती की, जोस बटलर IPL मध्ये सतत शतके झळकावत आहे, तुम्हाला हे का जमत नाही.

वॉर्नरने IPL मध्ये केली अप्रतिम कामगिरी केली

IPL च्या या हंगामात डेव्हिड वॉर्नरने तुफान फटकेबाजी केली. वॉर्नरने केवळ 12 सामन्यात 432 धावा केल्या. नाबाद 92 ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या होती. मात्र, तो आपल्या संघासाठी विजेतेपद मिळवू शकला नाही. शेवटच्या करा किंवा मरो लीग सामन्यात, वॉर्नरची बॅट मात्र शांत राहिली, परिणामी दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतर वॉर्नर खूपच निराश दिसत होता. मात्र, वॉर्नरला आपल्या मुलींसोबत थिरकताना पाहून तो IPL चा पराभव विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात केल्याचे दिसते. आगामी टी-20 विश्वचषकात वॉर्नर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...