आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Warning Teams In EPL; Paelis Kathdari Warns Of Hungarian Law Violations!

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा:ईपीएलमध्ये संघांना ताकीद; हंगेरीत नियम उल्लंघनप्रकरणी पाेलिस काेठडीचा इशारा !

लंडन/बुडापेस्ट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंग्लंड-विंडीज सलामी कसाेटीत नियमाचे उल्लंघन
  • सलामी कसाेटीतही खेळाडूंना पडला नियम पाळण्याचा विसर!

काेराेनामुळे चार महिन्यांपासून बंद असलेल्या क्रीडा विश्वाचे लाॅक आता उघडल्या गेले आहे. त्यामुळेच ११७ दिवसानंतर पुन्हा एकदा नव्या जाेमाने आंतरराष्ट्रीय स्पाेर्ट्‌्स इव्हेंटला वेग आला. यात रग्बीसह फुटबाॅल, क्रिकेट, बेसबाॅल, मिक्स मार्शल आर्ट्‌्सपाठाेपाठ फाॅर्म्युला-१ रेसच्या इव्हेंटचा समावेश आहे. एकूणच या विश्वात आता आनंदाचे वातावरण आहे. मात्र, असे असतानाही जगाच्या कानाकाेपऱ्यात पसरलेल्या काेराेनाचा धाेका अद्यापही कायम आहे. त्यामुळे यासाठी घालून दिलेल्या नियमावलीचे काटेकाेरपणे पालन व्हावे, याच सूचनेवर क्रीडा विश्वाला इव्हेंट आयाेजनाची परवानगी देण्यात आली. जल्लाेषाच्या भरात खेळाडू सर्रासपणे फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघन करत असल्याचा प्रत्यय इंग्लिश प्रीमियर लीग आणि सलामीच्या कसाेटीदरम्यान आला. इंग्लंड व विंडीज यांच्यातील कसाेटीदरम्यान खेळाडूंना या सर्व नियमांचा विसर पडला.

हंगेरी ग्रांप्रीमध्ये १३ लाखांच्या दंडाची कारवाई हाेणार

येत्या रविवारी हंगेरी ग्रांप्री फाॅर्म्युला वन रेस हाेणार आहे. यादरम्यान सरकार आणि आयाेजकांच्या वतीने कडक नियमावली तयार केली. या नियमाचे पालन न केल्यास १३ लाखांची दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

सलामी कसाेटीतही खेळाडूंना पडला नियम पाळण्याचा विसर!

नुकतीच साउथम्पटन येथे यजमान इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील सलामीची कसाेटी झाली. याच कसाेटीदरम्यान दाेन्ही संघांच्या खेळाडूंनी काेेराेनाचा धाेका टाळण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले नाही. मैदानावर दाेन्ही संघांच्या खेळाडूंनी नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. जल्लाेष करताना अलिगंणासह हातात घेण्याची प्रक्रीया कायम हाेती. सर्वांनी नियमाचे पालन करावे, अशी आयसीसीने ताकीद दिली हाेती. याशिवाय हे सर्व खेळाडू फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसते.