आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Washington Sundar; India Vs England 1st Test Live Cricket Score Update 8 Feb | IND VS ENG Today Match Day 4 Latest News And Update

IND vs ENG:चौथ्या दिवसाअंती भारताचा स्कोअर 39/1, विजयासाठी उद्या कराव्या लागणार 381 धावा

चेन्नई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सामना जिंकण्यासाठी भारताला मोडावा लागेल वेस्टइंडिजचा रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नईमध्ये पहिल्या कसोटीचा चौथा दिवस झाला. इंग्लंडने भारताला 420 धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 विकेट गमावून 39 धावा केल्या. रोहित शर्मा 12 रन काढून जॅक लीचच्या बॉलवर आउट झाला. चेतेश्वर पुजारा 12 रन आणि शुभमन गिल 15 धावांवर नॉटआउट आहेत. विजयासाठी भारताला अखेरच्या दिवशी 381 धावांची गरज आहे. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

इंग्लंडचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये 178 धावांवर ऑलआउट झाला आहे. आता भारतासमोर 420 धावांचे लक्ष्य आहे. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट घेतल्या. अश्विनने रॉरी बर्न्स, डॉम सिबली, बेन स्टोक्स, डॉम बेस, जोफ्रा आर्चर आणि जेम्स एंडरसनला माघारी पाठवले.

भारताला हा सामना जिंकण्यासाठी सर्वाधिक रन चेज करण्याचा रेकॉर्ड बनवावा लागेल. सध्या हा रेकॉर्ड वेस्टइंडीजच्या नावे आहे. वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरोधात 2003 मध्ये 418 धावांचे लक्ष्य गाठले होते. भारतीय संघ पहिल्या इनिंगमध्ये 337 धावांवर ऑलआउट झाला. तर, इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 578 धावा केल्या. भारताकडून अश्विनशिवाय नदीमने 2, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहने 1-1 विकेट घेतली.

भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 91 धावा केल्या. तर, वॉशिंग्टन सुंदर 85 धावांवर नॉटआउट राहिला. याशिवाय, चेतेश्वर पुजाराने 73 धावा केल्या. इशांत शर्मा 4 काढून आउट झाला. त्याला एंडरसनने ऑली पोपकडे झेलबाद केले. तर, शाहबाज नदीम शून्य आणि रविचंद्रन अश्विन 31 रन काढून आउट झाले. दोघांना लीचने आउट केले. यानंतर नदीमला स्लिपमध्ये बेन स्टोक्सकडे झेलबाद केले. सुंदर आणि अश्विनदरम्यान सातव्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी झाली.​

सुंदरचे अर्धशतक

सुंदरने सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावे आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात ब्रिस्बेनमध्ये 62 धावा केल्या होत्या.

तिसरा दिवस इंग्लंडच्या नावे

चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअंती भारताने 6 विकेट गमावून 257 धावा केल्या होत्या. यात ऋषभ पंत 91 रन (88 बॉल) आणि चेतेश्वर पुजारा 73 रन (143 बॉल) आउट झाले. या दोघांना डॉम बेसने आउट केले. बेसने 4 आणि जोफ्रा आर्चरने 2 विकेट घेतल्या. 5 विकेट गेल्या आहेत.

पुजारा पंतचे अर्धशतक

पुजाराने आपल्या करिअरचे 29वे अर्धशतक लगावले. त्याने पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 145 बॉलवर 119 रनांची पार्टनरशिप केली. पंतनेही चांगली खेळी करत 40 बॉलवर अर्धशतक लगावले. दरम्यान, फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला 379 धावांची गरज आहे.

भारताची खराब सुरुवात

दरम्यान, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 44 धावांवर भारताच्या दोन विकेट गेल्या. रोहित शर्माला 6 धावांवर जोफ्रा आर्चरने जोस बटलरकडे झेलबाद केले. तर, शुभमन गिलला 29 धावांवर आर्चरनेत जेम्स एंडरसनकडे झेलबाद केले. यानंतर, अजिंक्य रहाणे 1 आणि कर्णधार विराट कोहली 11 रन काढून आउट झाले. भारतात पहिल्यांदा खेळत असलेल्या डॉम बेसने दोन्ही विकेट घेतल्या.

अश्विन-बुमराहला 3-3 विकेट

​​​​​इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 578 धावांचा डोंगर केला आहे. रविचंद्रन अश्विनने जेम्स एंडरसनला आउट करुन इंग्लंडची इनिंग संपवली. जेम्स 1 धाव काढून आउट झाला. भारताकडून अश्विन आणि बुमराहला 3-3 विकेट मिळाल्या. तर, शाहबाज नदीम आणि इशांत शर्माने 2-2 फलंदाजांना माघारी पाठवले.

यापुर्वी बुमराहने डॉम बेसला LBW आउट केले. डॉम 34 धावांवर आउठ झाला. बेस आणि लीचमध्ये 9 व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडच्या संघाने 190.1 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. 2009 नंतर पहिल्यांदाच परदेशी संघाने भारतात 190+ ओव्हर फलंदाजी केली आहे. यापुर्वी 2009 मध्ये श्रीलंकाने अहमदाबादमध्ये 202.4 ओव्हर फलंदाजी केली होती.

अश्विनने सर्वाधिक ओव्हर टाकल्या

अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 53 पेक्षा जास्त ओव्हर टाकल्या आहेत. या त्याच्याकडून एका इनिंगमध्ये केलेल्या सर्वाधिक ओव्हर आहेत. यापुर्वी त्याने 2011/12 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एडिलेडमध्ये एका इनिंगमध्ये 53 ओव्हर टाकल्या होत्या.

भारतचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.

इंग्लंडचे प्लेइंग-11: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.+

बातम्या आणखी आहेत...