आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • 'We Win Medals In Competitions, So Why Isn't There A Gymnastics Center In Maharashtra?' Question Of State Gymnastics Association

औरंगाबाद:'आम्ही स्पर्धांमध्ये पदके जिंकतो, मग महाराष्ट्रात जिम्नॅस्टिकचे केंद्र का नाही?'- 'साई'च्या 'एनसीओई' योजनतेबाबत राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचा सवाल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो

जिम्नॅटिकच्या प्रत्येक प्रकारात औरंगाबाद आणि पर्यायाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी पदकतालिकेच्या अव्वल तीनमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. असे असताना महाराष्ट्राला नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई) च्या महाराष्ट्रातील केंद्रातून जिम्नॅस्टिक हद्दपार का करण्यात आला, असा सवाल महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी केला आहे. 

गेल्या अनेक वर्षांत देशभरात झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा, नॅशनल गेम्स, खेलो इंडिया सारख्या सर्व स्पर्धांमध्ये औरंगाबादेतील आणि महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. पदकतालिकेत अव्वल तीनमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रात जिम्नॅस्टिक खोलवर रुजलेला आहे. त्याचे निकालही आता दिसू लागले आहेत. औरंगाबादेत केंद्रात सुमारे तीनशे खेळाडू सराव करतात आणि शहरात हा आकडा दोन हजारांच्या घरात आहे. गत तीन वर्षात येथील शंभरावर खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. औरंगाबादेतील खेळाडूंच्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढत असताना शहरातील जिम्नॅस्टिक केंद्र बंद करणे हा या येथील जिम्नॅस्ट मंडळींवर अन्याय आहे. निकाल देऊनही आमचे केंद्र बंद केले का जात आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळालेले नाही. आम्ही यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला पण त्या प्रश्नाचे उत्तर अद्याप आलेले नाही, असे मकरंद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

अख्या पश्चिम विभागात केंद्र नसणार.. 

औरंगाबादेतील केंद्र हे पश्चिम विभागातील स्पोर्ट्स अथॉरिटीचे एकमेव जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्र बंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे केंद्र बंद झाल्यास अख्या पश्चिम विभागात साईचे एकही जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र उरणार नाही. जिम्नॅस्टिक येथील मातीत रुजलेला खेळ आहे. पदकांची आणि खेळाडूंची संख्या आणि उपलब्ध सुविधा पाहता सध्या औरंगाबाद 'साई'चे केंद्र सुरु रहावेच पण नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स सुद्धा औरंगाबादेत जिम्नॅस्टिक देण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे आशियाई जिम्नॅस्टिक युनियन (एरोबिक जिम्नॅस्टिक) चे तांत्रिक समिती सदस्य असलेले मकरंद जोशी म्हणाले. 

निकालांवर आधारित खेळांचा समावेश व्हावा: उपसंचालक 

औरंगाबादेतील 'साई' मध्ये एनसीओईमध्ये सहा खेळ आता आहेत. यात ऍथलेटिक्स, तिरंदाजी, तलवारबाजी, हॉकी, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगचा समावेश आहे. या केंद्रातून आता हॅण्डबॉल, जिम्नॅस्टिक, तायक्वांदो, जुडो, फुटबॉल,व्हॉलीबॉल, कबड्डी सारखे खेळ वगळण्यात आले आहेत. आमच्या वरिष्ठाना आम्ही विनंती केली आहे कि आत्तापर्यंतचे यश, गुणवत्ता, असलेल्या सुविधा यावर आधारित एक दोन खेळांचा समावेश करावा, असे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी सांगितले.