आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाेपिंग:वेटलिफ्टर संजीतावर 4 वर्षांची बंदी

नवी दिल्ली |2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काॅमनवेल्थ चॅम्पियन वेटलिफ्टर संजीता चानूला डाेपिंग चांगलेच महागात पडले आहे. यामुळे तिच्यावर आता नाडाच्या वतीने चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. नाडाने मनाई केलेली आैषधे संजीताने घेतली हाेती. तिचे गतवर्षी ३० सप्टेंबर २०२२ राेजी सॅम्पल घेण्यात आले हाेते. यादरम्यान केलेल्या वैद्यकीय चाचणीमधून संजीताने डाेपिंग केल्याचे समाेर आले. यातून तिची डाेप टेस्ट ही पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे नाडाने तिच्यावर बंदीची कारवाई करण्याचा निर्णय जाहीर केला. संजीताने २०१४ आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले हाेते. आता तिने या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे.