आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का?:सितसिपास हरल्यावर कारच्या मागे लपून तासन््तास रडला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीसचा टेनिसपटू स्टिफानोस सितसिपास पहिल्यांदा सिनसिनाटी ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला. २४ वर्षीय सितसिपासने मेदवेदेवला तीन सेटमध्ये हरवले.

-त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी टेनिस खेळणे सुरू केले. -सुरुवातीला तो वडिलांकडून मार्गदर्शन घेत होता. नंतर १४ व्या वर्षी त्याने प्रसिद्ध प्रशिक्षक पॅट्रिक मोरटोग्लू यांच्या अकादमीत प्रवेश घेतला. नंतर त्याच्यात सुधारणा झाली होती, असे ते म्हणाले होते.

- सितसिपास हा त्याच्या घरातील एकमेव टेनिसपटू नाही. त्याचे वडील अपोस्टोलोस हे टेनिस प्रशिक्षक होते, त्यांनी त्याला खेळात आणले. त्याची आई ज्युलिया व्यावसायिक टेनिसपटू, त्याचा धाकटा भाऊ व बहीणही टेनिसपटू आहेत.

- लहानपणी त्याला हरण्याचा तिरस्कार होता. तो हरले की गाड्यांमागे लपून तासन््तास तिथे रडायचा. हरल्याने तो इतका लाजिरवाणा व्हायचा की, तो कुणालाही तोंड दाखवत नव्हता.

- त्याचे आजोबा सर्गेई सालनिकोव्ह हे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता सोव्हिएत युनियन फुटबॉल संघाचे सदस्य होते. ते एफसी स्पार्टक मॉस्को संघ, रशियाच्या व्यावसायिक फुटबॉल संघाचे व्यवस्थापक होते.

- सितसिपासला मोकळ्या वेळेत व्हिडिओ डायरी बनवण्याची हौस आहे. तो म्हणतो - खेळाडू म्हणून आम्ही अनेकदा प्रवासात असतो, घरापासून दूर असतो. यामुळे मी स्वतःला आनंदी व प्रेरित ठेवण्यासाठी व्हिडिओ डायरी बनवते. ती मला आनंदित करते.

- सितसिपासला फोटोग्राफीचीही खूप आवड आहे. तो त्याच्या सोशल मीडिया चॅनलवर प्रवासाचे व्हिडिओ शेअर करत असतो. त्याला चाहते ग्रीक गॉड या नावाने संबोधतात.

- तो टेनिसपटू बनला नसता तर त्याला फुटबॉलपटू बनायचे होते.

बातम्या आणखी आहेत...