आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Will Make A Comeback In The T20 Champions League; Australia, India, England, Looking Forward To Cooking

क्रिकेट:टी-20चॅम्पियन लीग करणार पुनरागमन; ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाक आयोजनास उत्सुक

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिकेट: २००९ ते २०१४ पर्यंत झाली स्पर्धा, प्रक्षेपण प्रकरण व चाहत्यांच्या कमी संख्येमुळे करावी लागली बंद

टी-२० सध्या चाहत्यांचा सर्वाधिक आवडता प्रकार आहे. जगातील अनेक देशांत त्याची लीग देखील सुरू झाली आहे. विविध लीग मधील चॅम्पियन संघांना संधी देण्यासाठी २००९ मध्ये टी-२० चॅम्पियन लीग सुरू करण्यात आली होती. २०१४ पर्यंत चालली मात्र, प्रक्षेपण हक्क आणि प्रेक्षकांची कमी संख्या यामुळे स्पर्धा बंद करण्यात आली. आता पुन्हा ती सुरू करण्याची मागणी होत आहे. यात भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान सारख्या देशातील क्लबचा समावेश आहे. सरे क्लबचे प्रमुख रिचर्ड गाउल्डने म्हटले की, आम्ही चॅम्पियन लीगच्या पुनरागमनामुळे आनंदी आहोत. हे क्लब क्रिकेट परतल्या सारखे असेल. जेव्हा आपण फुटबॉल व रग्बीच्या क्लबचे आंतरराष्ट्रीय सामने पाहतो, तर क्रिकेटचे का नाही. ही पुनरागमनाची योग्य वेळ आहे.

आयपीएल राजस्थान रॉयल्स संघाचे मालक मनोज बादलेने म्हटले, ‘चॅम्पियन्स लीगसाठी चांगली गोष्ट असून ही एक छोट्या टी-२० लीगच्या उद्देशाने आहे. त्यामुळे उत्कृष्ट आयोजनाचा प्रभाव पडतो. आंतरराष्ट्रीय नियोजनाचे त्याच्यासमोर एक अाव्हान आहे.’ त्यांनी म्हटले की, त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी आयपीएल टीम आणि भारतीय क्रिकेट मंडळाचा पाठिंबा आवश्यक आहे. आयपीएलचे माजी संचालक सुंदर रमनने म्हटले की, मी त्याच्या पुनरागमनाचे पूर्णपणे समर्थन करतो. त्यासाठी मार्ग कसा काढावा, यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे. आर्थिक नियोजन कसे राहील. गाउल्डने म्हटले की, भले आर्थिक गोष्टींवर काम होत नसेल मात्र, सर्वजण मिळून पुन्हा स्पर्धा सुरू करण्यासाठी तयार होतील. मी आयपीएल संघांशी त्याबाबत चर्चा केली आहे. त्याला पुन्हा सुरू केले जाऊ शकते.

आयसीसीकडे अचूक वेळापत्रकाची संधी खेळाडूंची जागतिक संस्था फीकाचे प्रमुख टॉम मॉफेटने म्हटले की, हा चांगला विचार आहे. त्यासाठी योग्य कार्यक्रम तयार करावा लागेल. खेळाडू त्या गोष्टींना महत्त्व देतात, ज्या चांगल्या आहेत व ज्याचे आर्थिक बळ अधिक आहे. अशा आयसीसी व मंडळांना त्याबाबत जागतिक संरचनेकडे पाहण्याची गरज आहे. नियोजनही त्याचप्रकारे करायला हवे.

क्लब स्पर्धेला मौल्यवान बनवण्याची संधी : जोन लॉन्ग
आयीसीसचे माजी हेड ऑफ स्ट्रेटजी जोन लॉन्गने म्हटले की, कुठे तरी क्रिकेटला देशावरील निर्भरता कमी करता येईल. चॅम्पियन लीग सारख्या आयोजनातून क्लब क्रिकेटला मनोरंजक आणि मौल्यवान देखील बनवले जाऊ शकते.

या १२ संघांना मिळू शकते संधी
अाशिया| मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली, मुलतान सुलतान (पाक), कोलंबो (श्रीलंका), रॉयल्स (बांगलादेश)
वर्ल्ड ग्रुप| बारबाडोस सिडनी (ऑस्ट्रेलिया),पर्ल (अाफ्रिका), इगल्स (इंग्लंड), वेलिंगटन (न्यूझीलंड), युराे चॅम्प.
{यात आयपीएलच्या अव्वल संघांसह इतर देशांतील चॅम्पियन संघांना संधी मिळेल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील.

बातम्या आणखी आहेत...