आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Williamson To Miss World Cup; Leadership Dilemma For The New Zealand Team

क्रिकेट:विलियम्सन वर्ल्डकपला मुकणार; न्यूझीलंड संघासमाेर नेतृत्वाचा पेच

वेलिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या वनडे वर्ल्डकपची तयारी करत असलेल्या न्यूझीलंड संघाला माेठा धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार विलियम्सन यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत असताना जायबंदी झाला आहे. गंभीर दुखापतीमुळे त्याचा आॅक्टाेबर-नाेव्हेंबरमधील वनडे वर्ल्डकपमधील प्रवेश अडचणीत सापडला आहे. यामुळे त्याला या विश्वचषकाला मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. हीच दुखापत आता न्यूझीलंड संघासाठी महागात पडली आहे. कारण टीमसमाेर आता विश्वचषकादरम्यान नेतृत्वाचा नवा पेच निर्माण झाला आहे.

विलियम्सन हा यंदाच्या १६ व्या सत्रातील आयपीएलमध्ये गत चॅम्पियन गुजरात संघाकडून खेळत हाेता. मात्र, त्याला सलामी सामन्यात चेन्नई संघाविरुद्ध खेळताना गंभीर दुखापत झाली. यादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. यातून आता त्याला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर त्याला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.