आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Williamson's Slow Innings Breaks New Zealand Team's Glory; England Win By 20 Runs

वर्ल्डकप:विलियम्सनची संथ खेळी, न्यूझीलंड संघाच्या माेहिमेला ब्रेक; इंग्लंडचा 20 धावांनी विजय

ब्रिस्बेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड संघाचा कर्णधार जाेस बटलर (७३), क्रिस वाेक्स (२/३३) आणि सॅम कॅरेन (२/२६) यांनी उल्लेखनीय खेळीतून फाॅॅर्मात असलेल्या न्यूझीलंड टीमच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. याच खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने मंगळवारी टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड टीमला धूळ चारली. इंग्लंडने २० धावांनी सामना जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ गडी गमावत १७९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दमदाक झालेल्या न्यूझीलंड संघाला सहा गड्यांच्या माेबदल्यात १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. यातून इंग्लंड संघाने गत वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामन्यातील पराभवाची परतफेड आता न्यूझीलंड टीमला केली. संघाला सुमार आणि संथ फलंदाजीचा माेठा फटका बसला. कर्णधार विलियम्सनने १०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ४० चेंडूंत ४० धावा काढल्या. दुसरीकडे इंग्लंडच्या कर्णधार जाेस बटलरने ४७ चेंडूंत झंझावाती ७३ धावांची खेळी केली. यासह बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने अ गटातील आपला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंडने चार सामन्यांत दुसरा विजय संपादन करून गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी धडक मारली.

टर्निंग पॉइंट ३ षटकांत चार बळी न्यूझीलंड संघाला सुमार फलंदाजी महागात पडली. संघाने १५ ते १८ षटकांदरम्यान १६ धावांची कमाई करताना चार बळी गमावले. यातूनच सामन्याला कलाटणी बसली. एक वेळ संघाच्या नावे १४.४ षटकांत २ बाद ११९ धावांचा स्काेअर नाेंद हाेता. विजयासाठी ३२ चेंडूंत ६१ धावांची गरज हाेती. मात्र, विलियम्सन आणि फिलिप्सला धावसंख्येला गती देता आली नाही. स्टाेक्सने विलियम्सनला बाद केले. यासह इंग्लंडला विजयाचा मार्ग अधिक सुकर करता आला.

100 षटकार जाेस बटलरने पूर्ण केले टी-२० करिअरमध्ये. ही कामगिरी करणारा ताे पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला. क्विंटन डिकाॅक दुसऱ्या स्थानावर.

बातम्या आणखी आहेत...