आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Wimbledon 2021 Final Novak Djokovic Beat Matteo Berrettini Djokovic Won 20th Grand Slam With Roger Federer

विम्बल्डन:याेकाे सहाव्यांदा विम्बल्डन चॅम्पियन, 20वी ग्रँडस्लॅम ट्राॅफी; फेडरर, राफेल नदालशी साधली बराेबरी

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर वन टेनिसपटू नाेवाक याेकाेविक यंदाच्या सत्रातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या किताबाचा मानकरी ठरला. त्याने रविवारी पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने फायनलमध्ये इटलीच्या बेरेटिनीला पराभूत केेले. अव्वल मानांकित योकोविकने तीन तास २४ मिनिटे शर्थीची झुंज देत ६-७, ६-४, ६-४, ६-३ अशा फरकाने शानदार विजय साकारला. मॅरेथाॅन लढतीत नंबर वन याेकाेविकला झंुजवणाऱ्या सातव्या मानांकित बेरेटिनीची खेळी काैतुकास्पद ठरली. मात्र, त्याला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेे.

विजयासह सर्बियाच्या याेकाेविकने आपल्या सहाव्यांदा विम्बल्डन ट्राॅफीवर नाव काेरले. ताे सहाव्यांदा या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या किताबाचा मानकरी ठरला. तसेच त्याचे हे करिअरमधील २० वे ग्रँडस्लॅम ठरले आहे. यातून त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम किताब विजेत्या राफेल नदाल आणि स्विस किंग राॅजर फेडरर यांच्या विक्रमाशी बराेबरी साधली.

बातम्या आणखी आहेत...