आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनची राजधानी बीजिंग येथे 4 फेब्रुवारीपासून 24व्या विंटर ऑलिंपिक खेळांना सुरुवात होत आहे. विंटर ऑलिंपिक हा एक असा मेगा इव्हेंट आहे ज्यामध्ये सर्व खेळ बर्फावर खेळले जातात. 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत चीन, अमेरिका, भारतासह 91 देश सहभागी होत आहेत. या आर्टिकलमध्ये, आम्ही तुम्हाला विंटर ऑलिम्पिकशी संबंधित असे 8 फॅक्ट्स शेअर करत आहोत, जे तुमचे ज्ञान वाढवतील आणि या इव्हेन्टचा आनंद लुटण्यासाठी देखील उपयुक्त ठरतील.
फॅक्ट-1: पहिले विंटर ऑलिम्पिक गेम्स कधी आयोजित करण्यात आले?
विंटर गेम्स देखील ऑलिम्पिक मुव्हमेंटचा एक भाग आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती दर चार वर्षांनी याचे आयोजन करते. 1924 मध्ये प्रथमच विंटर ऑलिंपिकचे आयोजन फ्रान्समधील कॅमोनिक्स येथे करण्यात आले होते. 1924 ते 1992 या कालावधीत विंटर ऑलिंपिकचे आयोजन त्याच वर्षी होत होते जेव्हा समर ऑलिंपिक योजित करण्यात येत होते. यानंतर दोन्ही मेगा इव्हेंटचे आयोजन प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने करण्यात येऊ लागले.
फॅक्ट-2: किती खेळ, किती इव्हेन्ट
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 7 खेळांच्या 109 स्पर्धा होणार आहेत. म्हणजेच 109 सुवर्णपदकांसाठी स्पर्धा होणार आहे. यामध्ये 91 देशांतील 2871 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 1581 पुरुष आणि 1290 महिला खेळाडूंचा समावेश आहे.
फॅक्ट-3: भारतातील किती खेळाडू आहेत
बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारतातील फक्त एकच एथलीट आरिफ खान सहभागी होत आहे. आरिफ स्लॅलम आणि जायंट स्लॅलम स्कीइंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. विंटर ऑलिम्पिक इतिहासात भारताचे प्रतिनिधित्व करणारा आरिफ हा १६वा खेळाडू ठरणार आहे.
फॅक्ट-4: यावेळी वाद का?
जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनेक मुद्द्यांवर एकमेकांसमोर आहेत. याचा परिणाम हिवाळी ऑलिम्पिकवरही झाला आहे. चीन प्रथमच हिवाळी खेळांचे आयोजन करत आहे. अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये (विशेषतः शिनजियांगमध्ये) मानवाधिकार उल्लंघनाची प्रकरणे वाढली असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याला उद्घाटन आणि समारोप समारंभासाठी पाठवण्यास नकार दिला आहे.
आता भारतानेही राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. मात्र, भारताने बहिष्कार टाकण्याचे कारण वेगळे आहे. गेल्या वर्षी गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. या चकमकीत जखमी झालेल्या एका सैनिकाला चीनने ध्वजवाहक बनवले आहे. चीन या खेळात राजकारण आणत असल्याचा आरोप करत भारताने राजनैतिक बहिष्कार टाकला आहे.
फॅक्ट-5: बीजिंग हे विंटर आणि समर दोन्ही खेळांचे आयोजन करणारे पहिले शहर बनले
हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू होताच बीजिंगने एक अनोखा विक्रम केला आहे. उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन्ही ऑलिम्पिकचे आयोजन करणारे हे जगातील पहिले शहर बनले आहे. 2008 मध्ये, उन्हाळी ऑलिंपिक बीजिंग येथे आयोजित करण्यात आले होते.
फॅक्ट-6: मागील तीन ऑलिंपिक आशियात
आशियामध्ये सलग तिसऱ्यांदा उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे. 2018 हिवाळी ऑलिंपिक प्योंगचांग (दक्षिण कोरिया) येथे आयोजित करण्यात आले होते. 2021 मध्ये टोकियो येथे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ झाले. आता चीन हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करत आहे.
फॅक्ट-7: हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सर्वात यशस्वी देश कोणता
हिवाळी ऑलिम्पिकमध्ये नॉर्वे हा सर्वात यशस्वी देश आहे. नॉर्वेने आतापर्यंत १३२ सुवर्णांसह ३६८ पदके जिंकली आहेत. अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेने 105 सुवर्णांसह 305 पदके जिंकली आहेत. जर्मनी 92 सुवर्णांसह 240 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चीन 17 व्या क्रमांकावर आहे. त्याने 13 सुवर्णांसह 62 पदके जिंकली आहेत. नॉर्वे हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 8 वेळा पदक जिंकणारा टॉपर आहे. सोव्हिएत युनियनने 7 वेळा हा पराक्रम केला आहे. अमेरिका फक्त एकदाच टेबल टॉपर आहे.
फॅक्ट-8: हिवाळी ऑलिंपिक कुठे पाहू शकता?
भारतात हिवाळी ऑलिम्पिकचा आनंद सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर घेता येईल. तुम्ही हा इव्हेन्ट Sony Liv अॅपवरही पाहू शकता. भारतीय वेळेनुसार 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून उद्घाटन सोहळा होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.