आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी:पॅट कमिन्स मालिकेतून बाहेर, स्मिथकडे संघाचे नेतृत्व कायम

अहमदाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला येत्या गुरुवारपासून सुरुवात हाेत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सला सहभागी हाेता येणार नाही. त्यामुळे ताे या मालिकेतून बाहेर पडला आहे. आईच्या आजारपणामुळे ताे तिसऱ्या कसाेटीपूर्वीच मायदेशी परतला हाेता. आता त्याने चाैथ्या कसाेटीतही सहभागी न हाेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे स्मिथकडे नेतृत्व कायम राहणार आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने इंदूर कसाेटीत धडाकेबाज विजय साजरा केला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला सलगच्या दाेन पराभवानंतर पहिला विजय साजरा करता आला. याच विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही गाठता आली.

बातम्या आणखी आहेत...