आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women Maharashtra Kesari | A New Controversy Arose Over The Organization Of 'wrestling' Competition In The State Organization

महिला महाराष्ट्र केसरी:राज्य संघटनेत पुन्हा ‘कुस्ती’स्पर्धा आयाेजनावरून निर्माण झाला नवा वाद

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील काेथरूड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा घेऱ्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची बैठक हाेऊन सांगली येथे २२ व २३ मार्च राेजी कुस्ती स्पर्धा घेण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली आहे. मात्र, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थायी समितीने पुणे शहरा जवळ लाेणीकंद येथे घेण्याचे निश्चित केल्याने महिला कुस्ती स्पर्धाच्या निमित्ताने महाराष्ट्र कुस्ती सघातील वाद पुन्हा चव्हाटयावर आल्याचे पाहवयास मिळत आहे.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा नेमकी काेण घेणार हा वाद यापूर्वी निर्माण झाला हाेता. राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यामुळे दाेन गटात दावे-प्रतिदावे झाले हाते. अखेर माजी खासदार रामदास तडस यांचे संघटनेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची मान्यता मिळाल्यानंतर बाळासाहेब लांडगे गटाने माघार घेतल्याने वाद शमला हाेता. परंतु महिला कुस्ती स्पर्धाचे निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले की, सांगलीत २३ व २४ मार्च राेजी महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा आयाेजित करण्यात आली असून विजेत्यास चांदीची गदा दिली जाणार आहे.

महासंघाची आम्हास मान्यता बाळासाहेब लांडगे म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेस संलग्न ४५ संस्था आहे. शहरी व ग्रामीण भागातील संस्था आमच्याशी जाेडलेल्या असल्याने ऑलम्पिकची मान्यता आम्हास सर्वात जुनी कुस्तीगीर परिषद म्हणून आहे. उच्च न्यायालयाने देखील कुस्ती घेण्यासाठी आम्हास मान्यता दिलेली आहे. अस्थायी समितीचे अस्तित्व कायम नसून आम्ही आमच्या सर्व स्तरातील स्पर्धा आयाेजित करत आहे. अस्थायी समिती महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयाेजित करणारा याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, बाकी मी काेणावर बाेलणार नाही हे प्रकरण न्यायालयात आहे. ऑलम्पिक संघटनेची आम्हास मान्यता असून खेळाडूनंा प्राेत्साहन देण्याचे काम आम्ही करताे आहे.

बातम्या आणखी आहेत...