आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women Match | Rusha Ghosh | Marathi News | 18 year old Richa Sets New Record After 14 Years; Celebrate The Fastest Half century

26 चेंडूंत वेगवान अर्धशतक:18 वर्षीय ऋचाचा 14 वर्षांनंतर नवा विक्रम; सर्वात वेगवान अर्धशतक साजरे

क्वीन्सटाऊन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला वनडे; ऋचा घोषचे 26 चेंडूंत वेगवान अर्धशतक; कमी चेंडूंत वेगवान अर्धशतक

भारतीय महिला संघातील खेळाडूंनी न्यूझीलंड दाैऱ्यावर विक्रमाला गवसणी घालण्याची माेहीम कायम ठेवली. भारताच्या युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घाेषने मंगळवारी यजमान न्यूझीलंडविरुद्ध चाैथ्या वनडे सामन्यात विक्रमी खेळी केली. तिने २६ चेंडूंत अर्धशतक साजरे केले. यासह तिने कमी चेंडूंत सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा १४ वर्षांनंतर विक्रम नाेंद केला. यादरम्यान तिने २००८ मधील रुमेली धारच्या (२९ चेंडू) विक्रमाला मागे टाकले.

पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी २० षटकांचा खेळवण्यात आला. सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामाेरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५ बाद १९१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताचा १७.५ षटकांत अवघ्या १२८ धावांत खुर्दा उडाला. भारताकडून ऋचाने एकमेव अर्धशतकी खेळी केली.

वर्ल्डकपपूर्वी गाेलंदाजी संघाची दुबळी बाजू : मिताली
महिला वनडे वर्ल्डकप येत्या ४ मार्चपासून सुरू हाेणार आहे. मात्र, भारतीय संघ सध्या सुमार गाेलंदाजीमुळे अडचणीत सापडला आहे. ‘वर्ल्डकपपूर्वी संघाला गाेलंदाजीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. यातूनच स्पर्धेत निश्चित यशाचा पल्ला गाठता येईल. यासाठी आम्ही वेगळे डावपेच अाखले आहेेत. यातून दर्जेदार गाेलंदाजीमध्ये सातत्य ठेवता येईल. अशी प्रतिक्रिया कर्णधार मिताली राजने दिली.

एमेलिया केरची क्रमवारीत माेठी प्रगती; टाॅप-१० मध्ये दाखल
न्यूझीलंड संघाच्या ऑलराउंडर एमेलिया केरची मालिकेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने चाैथ्या सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी केली. तिला वनडे क्रमवारीत माेठा फायदा झाला. तिने सात स्थानांनी प्रगती साधली. यातून तिला ऑलराउंडर क्रमवारीची टाॅप-१० मध्ये धडक मारता आली. तिने नववे स्थान गाठले. तसेच तिने फलंदाजी क्रमवारीत २१ स्थानांनी प्रगती साधली.

यष्टिरक्षक फलंदाज ऋचाने रुमेलीचा विक्रम ब्रेक केला
दीप्ती मालिकेत सर्वाेत्तम भारतीय गाेलंदाज ठरली. ४ सामन्यांत ८ बळी घेतले. ६.५७ च्या रनरेटने धावा दिल्या.
चाैथ्या वनडेत पूजाने एका षटकात १२ धावा दिल्या. दीप्तीने ४ षटकांत ४९ धावा, मेघनाने ४५ धावा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...