आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women's Cricket Lags Behind Board Deals, Quality Of Cricket, Star Culture

दिव्य मराठी विश्लेषण:मंडळाचा व्यवहार, क्रिकेटचा दर्जा, स्टार कल्चरमुळे महिला क्रिकेट मागे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1973 पासून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 6 व इंग्लंडने 4 विश्वचषक जिंकले
  • 1978 पासून खेळणाऱ्या भारताला अद्याप चषकाची प्रतीक्षा

भारतीय महिला क्रिकेट संघाने गत एकदिवसीय व टी-२० विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, संघाला अद्यापही आपल्या पहिल्या आयसीसी चषकाची प्रतीक्षा आहे. संघाने १९७८ मध्ये आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. दुसरीकडे, १९७३ पासून एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ६ आणि इंग्लंडने ४ वेळा विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडच्या नावे एक विश्वचषक आहे. २०१८ मध्ये झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशकडून आपला पराभव झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे, संघाचे काही खेळाडूंवर निर्भर राहणे, ज्यामुळे खेळाडू स्वत:ला संघापेक्षा मोठ्या समजू लागतात. संघात अनेक बदल होतात. ३५१ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या इंग्लंडने अद्याप १३४ खेळाडूंना संधी दिली. दुसरीकडे, भारताने २७७ एकदिवसीय सामन्यांत १३० खेळाडूंना आजमावले. संघाबाबत नेहमी काही ना काही वाद होत राहतात, ज्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो. २०१८ मध्ये रमेश पोवारला मिताली राजसोबत वाद झाल्याने पद सोडावे लागले होते. त्यानंतर डब्ल्यू. बी. रमण यांना प्रशिक्षक बनवण्यात आले. माहितीनुसार, सीएसीचे सदस्य व संघ निवड समिती सदस्यासोबत वादामुळे त्यांना पद सोडावे लागले. आता पुन्हा एकदा रमेश पोवार यांना जबाबदारी देण्यात आली.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंडची आपली टी-२० लीग; आयपीएलमध्ये महिला टी-२० चॅलेंजच्या तीन सत्रांत केवळ ९ सामने झाले

लिसा स्टालेकरने बीसीसीआयला फटकारले
भारतीय फलंदाज वेदा कृष्णमूर्ती कठीण काळाशी संघर्ष करत आहे. कोरोनामुळे तिच्या आई व बहिणीचे निधन झाले. ऑस्ट्रेलियाची माजी अष्टपैलू व समालोचक लिसा स्टालेकरने या वेळी वेदाच्या पाठीशी उभे न राहिलेल्या बीसीसीआयला फटकारले. तिने सोशल मीडियावर लिहिले की, ‘इंग्लंड दौऱ्यावर वेदाची निवड न करणे, ते आपल्या पद्धतीने योग्य मानत असतील. मला या गोष्टीचा राग येतो की, एका करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. तिची विचारपूसही केली नाही, ती स्वत:ला कशी सावरत आहे. कुठल्याही संघटनेला आपल्या खेळाची नव्हे तर खेळाडूची चिंता करायला हवी.’

महिला क्रिकेट मागे पडण्याची मुख्य कारणे

१. देशांतर्गत दर्जाहीन क्रिकेट
संघ संघर्ष करण्याचे एक कारण म्हणजे देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा अत्यंत खराब आहे. २०१७ मध्ये १९ वर्षांखालील स्पर्धेत नागालँडचा संघ अवघ्या २ धावांवर ढेपाळला. २००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्याने पुरुष क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला. मात्र, महिला आयपीएल सुरू होऊ शकली नाही.

३ वर्षांपासून महिला टी-२० चॅलेंज होत आहे. यात आतापर्यंत केवळ ९ सामने झाले. ऑस्ट्रेलियाने २०११ मध्ये पुरुष व २०१५ मध्ये महिला बिग बॅश लीग सुरू केली. २०१६ मध्ये इंग्लंडने किया सुपर लीगची सुरुवात केली. २०१९ पर्यंत सुरू होती. या वर्षापासून पुरुष व महिला प्रकारांत द हंड्रेड स्पर्धा सुरू होत आहे.

२. महिला वरिष्ठ एकदिवसीय लीग सुरू करण्यास उशीर
इंग्लंडमध्ये १९९७ पासून महिला काउंटी वनडे मालिका खेळवली जात आहे. त्यात विदेशी खेळाडूही सहभागी होतात. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना शिकण्यास मिळते. फुटबॉलप्रमाणे येथे काउंटीचेदेखील डिव्हिजन-१, डिव्हिजन-२, डिव्हिजन-३ असे तीन प्रकार आहेत.

तालिकेत तळाला राहणाऱ्या संघाला बाहेर केले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये महिला नॅशनल लीग १९९६ पासून खेळवली जात आहे. येथेही विदेशी खेळाडूंना संधी मिळते. भारतात या दोन्ही देशांच्या तुलनेत १० वर्षांनी लीग सुरू झाली. वरिष्ठ महिला वनडे लीगची सुरुवात २००६ मध्ये केली. यात केवळ एकाच संघाचा दबदबा आहे. १२ पैकी ११ सत्रे रेल्वे संघाने जिंकली आहेत.

३. महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष
महिला क्रिकेटला प्रोत्साहन न देण्यास बीसीसीआय जबाबदार आहे. संघाने मार्च २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय मालिका खेळली. यादरम्यान, पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध खेळत होता. अनेक सामन्यांदरम्यान दोन्ही संघ एकाच वेळी मैदानावर असतात. नियोजन करताना मंडळाने सामने वेगवेगळ्या दिवशी ठेवण्यावर लक्ष दिले नाही.

भारत-इंग्लंड महिला कसोटी १६ जूनपासून आणि कसोटी चॅम्पियनशिपचा सामना १८ जूनपासून सुरू होत असल्याने तेव्हाही दोन दिवस समान येत आहेत. गतवर्षी महिला टी-२० चॅलेंजचे आयोजनदेखील महिला बिग बॅशदरम्यान करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...