आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुषांच्या आयपीएलप्रमाणेच आता महिलांची आयपीएलही सुरू होणार आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये ती सुरू होऊ शकते. मार्चमध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धेबाबत अडचण आल्यास सप्टेंबरचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. बीसीसीआय आपल्यासाठी विंडोचा विचार करत आहे. अहवालानुसार, मंडळ महिला आयपीएलच्या पहिल्या सत्रासाठी मार्च किंवा सप्टेंबर विंडोची चाचपणी करतोय. आयसीसीसह अनेक भागधारकांशी चर्चा केली असली तरी आयसीसीच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा या दोघांनीही पुष्टी केली आहे की, मंडळाने २०२३ पासून महिला आयपीएलची योजना आखली आहे.
मंडळाचे सचिव जय शहांनी वृत्ताचे केले खंडन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.